शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

खेड येथे भाचीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्यावर चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 3:46 PM

भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राजगुरुनगर : वरुडे ( ता. खेड ) येथील भाचीची छेड काढून त्रास देत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या मामांवर चाकुने वार करणाऱ्या रोडरोमिओ व त्याच्या तीन मित्रांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत चाकूने वार व मारहाण केल्यामुळे अक्षय मारूती रणपिसे व गणेश मारूती रणपिसे (रा. गाडकवाडी , ता. खेड ) हे जखमी झाले आहेत. तर नवनाथ रमेश घोडके, कुणाल रविंद्र सोनावणे ( रा. वरुडे ,ता. खेड ) व त्यांचे दोन मित्र (नाव समजू शकले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    ही घटना मंगळवारी (दि. २४ ) घडली असून फिर्यादी अक्षय रणपिसे याचा भाऊ दत्ता रणपिसे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नवनाथ घोडके यांस आमच्या भाचीला त्रास देऊ नको व तिच्या मागे फिरू नको असे समजावून सांगत होता. परंतु, ते समजावून घेण्याऐवजी नवनाथ याने दत्ता यासं रस्त्यांवरील दगड मारुन दुखापत केली तसेच मारहाण केली. सायंकाळी अक्षय याला कामावरून आल्यावर ही घटना समजली. त्यावर अक्षय याने भाऊ गणेश रणपिसे व चुलत भाऊ दत्ता रणपिसे याच्यासमवेत वरूडे येथे नवनाथ घोडके याचे घरी जाऊन त्याचे वडील रमेश घोडके यांना घराबाहेर बोलाऊन झालेला प्रकार सांगितला. त्याचवेळी नवनाथ व त्याच्या तीन साथीदारांनी येऊन अक्षय व गणेश याला शिवीगाळ करुन मारहाण केली तसेच चाकुने वार करून दुखापत केली. याप्रकरणी खेड पोलिसांत चौघांविरुद्ध बुधवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाKhedखेडPoliceपोलिसMolestationविनयभंग