सराईत गुंडांकडून तरुणावर कोयत्याने वार; वारजे माळवाडीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 13:49 IST2021-03-31T13:47:55+5:302021-03-31T13:49:42+5:30

पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन जाणार्‍या तरुणाला सराईत गुंडांनी अडवून त्याच्यावर केले कोयत्याने वार

Knief attack on youth by criminals ; Crime filed in Warje Malwadi | सराईत गुंडांकडून तरुणावर कोयत्याने वार; वारजे माळवाडीत गुन्हा दाखल

सराईत गुंडांकडून तरुणावर कोयत्याने वार; वारजे माळवाडीत गुन्हा दाखल

पुणे : पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन जाणार्‍या तरुणाला सराईत गुंडांनी अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करुन जबर जखमी करण्याचा प्रकार वारजे माळवाडीतील रामनगरमध्ये घडला. याप्रकरणी वारजे माळवाडीपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

दाद्या मिसाळ (रा. रामनगर, वारजे), शेखर खवळे (रा. कर्वेनगर) बाळ्या येनपुरे आणि सचिन हिरेमणी (दोघे रा. रामनगर, वारजे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी परशुराम गायकवाड (वय २७, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याृद दिली आहे. गायकवाड हे २९ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पेंटिंगच्या कामाचे पैसे घेऊन मोटारसायकलवरुन घरी जात होते. यावेळी रामनगरमधील हनुमान चौकात गुंडांनी त्यांची गाडी गायकवाड यांच्या गाडीला आडवी घालून थांबायला लावले. त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी करु लागले. त्यांच्यावर कोयत्याने वार करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या मदतीला येत असलेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून पळवून लावून परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Knief attack on youth by criminals ; Crime filed in Warje Malwadi