शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅक’मुळे विद्यापीठ झाले चकाचक

By admin | Updated: January 23, 2017 02:45 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिलची (नॅक) समिती भेट देणार असल्याने विद्यापीठाचा परिसर चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शैक्षणिक माहितीबरोबरच विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांना नॅक समितीकडून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यापीठाचा परिसर नीटनेटका करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.नॅक समितीकडून येत्या २३ ते २५ जानेवारी या कालावधीत विद्यापीठाची तपासणी केली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपासून शैक्षणिक माहिती जमा करण्यास; तसेच विद्यापीठाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता समितीच्या सदस्यांसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे व इतर अधिकारी सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर समितीकडून विद्यापीठातील विविध विभागांना भेटी दिल्या जातील. समितीकडून पायाभूत सुविधा, संशोधनाचा दर्जा, विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती आदी बाबींची तपासणी केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने नॅक समितीसाठी लागणारी सर्व माहिती तयार करून ठेवली आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी तसेच विद्यापीठाबाहेरील अधिकाऱ्यांनी तपासणीची ‘रंगीत तालीम’ केली आहे.विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासूनच ते मुख्य इमारतीपर्यंतचा परिसर स्वच्छ केला जात आहे. नॅकमुळे रविवारी सुद्धा विद्यापीठाचे कामकाज सुरू राहणार आहे. तसेच, सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाकडे तयारीसाठी काही तास उरलेला असल्याने विद्यापीठाचे अधिकारी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यालगतच्या झाडांना, तसेच विद्यापीठातील इमारतींच्या भिंतींना रंगरंगोटी केली जात आहे. तसेच, सुशोभीकरणासाठी विविध ठिकाणी फुलांच्या कुंड्या ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)