शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

पतंग उडवणे ठरतंय जीवघेणा खेळ; नायलॉनच्या मांजात अडकलेल्या ८४ पक्ष्यांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 09:40 IST

साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांजा जीवघेणा ठरत आहे

पुणे : पतंगबाजीचा भरपूर आनंद नुकताच आपण सर्वांनी लुटला. परंतु, या पतंगबाजीत वापरलेल्या नायलॉन मांजामुळे आता पक्ष्यांवर ‘संक्रांत’ आली आहे. शहरात अनेक ठिकाणी नायलॉन मांज्यामध्ये पक्षी अडकत असल्याचे चित्र आहे. मांज्यात अडकल्याने ते जखमी होत आहेत. अशा ८४ पक्ष्यांची सुटका गेल्या पंधरा दिवसांमध्ये पक्षीप्रेमींनी केली आहे. याचवेळी नायलॉन मांजा वापरू नये, याबाबत ते जनजागृतीही करत आहेत.

शहरात वाइल्ड ॲनिमल्स ॲण्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी कार्यरत आहे. त्याची स्थापना आनंद तानाजी अडसूळ यांनी केली. त्यांचे सदस्य विविध ठिकाणी असून, ते मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांना कात्रज येथील राजीव गांधी अनाथालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. ज्या पक्ष्यांना जखम झालेली नाही, त्यांचा मांजा काढून तिथूनच आकाशात मुक्त विहारासाठी सोडण्यात आले.

या अभियानात जय मोरे, लक्ष्मण वाघमारे, मयूर बिबवे, नितीन ताकवले, रवी जगधने, करण वैरागर, सौरभ शिंदे, मयूर दीक्षित, संजय मुदलीयार, अजय बनसोडे, संदेश रसाळ, पंकज मिटकरी, मनोज केळकर, अनिकेत गुजर, शुभम ढवळे, धनंजय कदम, सुमित अडसूळ, राजरत्न गायकवाड, संदेश चौगुले आदींचा सहभाग आहे.नायलॉन मांज्यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली, तरीही अनेकजण त्याचा वापर करत आहेत. काही ठिकाणी लहान मुलांना साधा मांजा वापरा, अशी जनजागृती केली. तेव्हा त्या मुलांनी शपथ घेऊन नायलॉन मांजा वापरणार नाही, असे सांगितले.

साधा मांजा वापरल्यानंतर तो पक्ष्यांसाठी घातक ठरत नाही. परंतु, बंदी असलेल्या नायलॉन मांज्याचा वापर सर्रास दिसून येत आहे. या मांज्याने पक्षी त्यात अडकला की, तो जखमी होतो. त्यामुळे साधा मांजा वापरावा, जेणेकरून तो पक्ष्यांना त्रासदायक ठरणार नाही. - आनंद अडसूळ, वाईल्ड ॲनिमल्स ॲन्ड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी

मांज्यातून जीवदान मिळालेले पक्षी

- ४५ घार- १५ कावळे- ९ गव्हाणी घुबड- १५ पारवे

टॅग्स :PuneपुणेMakar Sankrantiमकर संक्रांतीPoliceपोलिसSocialसामाजिकAccidentअपघात