पुणे महानगरपालिकेत आज किरीट सोमय्यांचा सत्कार; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 12:03 IST2022-02-11T11:49:23+5:302022-02-11T12:03:22+5:30
ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली तिथेच भाजप करणार किरीट सोमय्यांचा सत्कार...

पुणे महानगरपालिकेत आज किरीट सोमय्यांचा सत्कार; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुणे: मागील आठवड्यात किरीट सोमय्या (kirit sommay) यांच्यासोबत पुणे महानगरपालिका धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर यावरून मोठे राजकारण रंगलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना अटक केली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांना पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायऱ्यावर रोखण्यात आलं होतं त्याच पायऱ्यावर आज त्यांचा पुणे शहर भाजपच्या वतीने सत्कार केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. आज सायंकाळी चार वाजता जरी हा कार्यक्रम होणार असला तरी सकाळपासूनच पुणे महानगरपालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारामधून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करूनच त्याला आत प्रवेश दिला जातोय.