शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वर्गखोलीअभावी बालवाडी रस्त्यावर

By admin | Updated: July 9, 2015 02:31 IST

महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे.

पिंपळे गुरव : अंगणवाडी संदर्भातल्या अनेक समस्यांनी अंगणवाडीसेविका हैराण आहेत. त्यातच महिला व बालकल्याण विभागाने जुनी सांगवीतील अंगणवाडी ज्या खोलीत भरते, त्याचे भाडेच दिले नसल्याने जागामालकाने वर्गाला कुलूप घातले आहे. त्यामुळे चिमुकल्यांना रस्त्यावरच आपले ठाण मांडावे लागले आहे. जुनी सांगवीतील अंगणवाडी क्र. ५२ ही जयमालानगर येथे भरते. एका जागामालकाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अवघ्या सातशे रुपये भाड्याने आपला गाळा दिला होता. मात्र, महिला व बालकल्याण विभागाला हे भाडेही चार महिन्यांपासून भरता आलेले नाही. त्यामुळे जागामालकाने गाळ्याला कुलूप लावले आणि पर्यायी जागा शोधण्यास अंगणवाडीसेविकेला सांगितले. मात्र, अनेक ठिकाणी शोधूनही जागा मिळत नाही. शासन मात्र सातशे ते साडेसातशे रुपये भाडे असलेली खोली भाड्याने घेण्यास सांगते. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. परंतु, नाईलाजास्तव तिथे शिक्षण घेत आहेत. प्रशासनाने थकलेले भाडे त्वरित द्यावे, अशी मागणी होत आहे.शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या गोष्टी असायला हव्यात. त्यांपैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडीसेविकांच्या निर्धारामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे. (वार्ताहर)> परिसरात अनेक चांगल्या शाळा असूनही आम्ही आमची मुले इथे अंगणवाडीत घालतो. मात्र, शासनाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आमच्या पाल्यांवर होत आहे. केवळ कागद रंगवू नका. आमच्या पाल्यांना आवश्यक सोईसुविधा द्या. वर्गाअभावी आमच्या मुलांना रस्त्यावर बसावे लागत आहे. बौद्धिक विकास होईल, अशी कोणतीच गोष्ट येथे नाही. मात्र, याचे शासनाला काही देणे-घेणे नाही. या बालवाडीला लवकरात लवकर वर्ग मिळवून द्यावा. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. >आज सर्वत्रच इंग्रजी शाळेमध्ये मुले घातली जातात. सांगवी परिसरातही तीच परिस्थिती आहे. शासनाने वयाची अट किमान ३ वर्षे केलेली असतानाही आज बहुतांश शाळांमध्ये २ वर्षे वयापासूनच प्रवेश दिले जात आहेत. अगदी गल्लोगल्ली या शाळा आहेत. त्यामुळे बालवाडीकडे मुलांना आकर्षित करणे खूपच अवघड आहे. अशा परिस्थितीतही सांगवीतील बालवाडीत आज जवळपास ३० ते ४० बालकांची उपस्थिती असते. एसटी कॉलनी व जयमालानगर या भागातली ही मुले असतात. दहा बाय दहाच्या खोलीत ही मुले दाटीवाटीने बसतात. शासनाचा नियम आहे की, मुलांना खेळण्यास मैदान, स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, वीज या बाबी असायला हव्यात. यापैकी एकही गोष्ट आज या अंगणवाडीत दिसत नाही. केवळ अंगणवाडी सेविकांच्या निधार्रामुळे अंगणवाड्या टिकून आहेत. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या फक्त कागदी घोडे नाचविण्याच्या कारभारामुळे अंगणवाड्या शेवटच्या घटका मोजत आहेत. विद्यार्थी मिळविणेही अवघड होऊन बसले आहे, अशी अवस्था आहे.