शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
2
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
3
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
4
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
5
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
6
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
7
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
8
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
9
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
10
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
11
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
12
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
13
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
14
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
15
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
16
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
17
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
18
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
19
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
20
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

पदाचा दुरुपयोग; बनावट कागदपत्रांद्वारे किडनी प्रत्यारोपण, अजय तावरेला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 21:14 IST

पोर्शे प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे

पुणे: रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेला ससून, सर्वोपचार रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरेला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे याने आपल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली. त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या गुन्ह्यात त्याच्या आणखी कोणत्या सहकाऱ्याचा सहभाग आहे का, याबाबत तपास करायचा आहे, असे सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितले.

कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे त्याला न्यायालयाचे प्रॉडक्शन वॉरंटने बुधवारी ताब्यात घेऊन गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याप्रकरणी अजय तावरेसह एकूण सतरा आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये रुग्ण, रुग्णाची पत्नी, रुग्णाचे नातेवाईक, बनावट दाते, डॉक्टरांचा समावेश आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती.

याप्रकरणी आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीत अवयव दाता आणि प्रत्यारोपित रुग्णाची ओळख पडताळून कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीची असल्याचे निष्पन्न झाले. डॉ. अजय तावरे हा समितीचा अध्यक्ष होता. त्याने या प्रकरणातील किडनी दाता व प्रत्यारोपित रुग्ण व साक्षीदार नातेवाइकांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात त्याची मुख्य जबाबदारी होती, असे आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात नमूद आहे.

‘ससून’च्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीच्या मुलाखतीसाठी रुग्ण अमित साळुंखेची पत्नी सुजाता ऐवजी हजर राहिलेल्या सारिका सुतारच्या वयात तफावत होती. आरोपी शंकर पाटील, सारिका सुतार यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. समितीच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांच्या उत्तरात विसंगती आढळून आल्या. तरीही तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिली. तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने एकूण नऊ किडनी प्रत्यारोपण प्रकरणांना परवानगी दिली आहे. त्याबाबत तपास करायचा असून, आणखी काही अवयव दान प्रकरणांमध्ये गैरप्रकार केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपी अजय तावरेला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी एसीपी गणेश इंगळे व सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

‘रुबी’च्या डॉक्टरांविरोधात आरोपपत्र नाही..

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासात रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी, रुग्णालयातील मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. अभय सद्रे, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. भूपत भाटी, डॉ. हिमेश गांधी, प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे दिसून आले नाही. डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कायदेशीर मार्गाने केली असून, आरोपींनी बैठकीच्या वेळी खोटे बोलून डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यामुळे या सर्वांविरोधात सबळ पुरावे नसल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय