शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

भाजी आणण्यासाठी सासू गेली असताना जावयाने संधी साधत केले अल्पवयीन मेव्हुणीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 12:19 AM

सिंहगड रोड पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देसासुने दिली तक्रार : हिंगणेमधील घटना 

पुणे : अल्पवयीन मुलीला घरात ठेवून पहाटे भाजी आणायला सासू गेली असताना जावयाने कुलूप काढून आपल्या मेव्हणीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंगणे खुर्द येथील एका महिलेने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी जावयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे.त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून ती पतीबरोबर दौंड तालुक्यातील केडगावला राहते. ही महिला आपल्या दोन लहान मुलींना घरात ठेवून बाहेरुन कुलूप लावून पहाटे भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा जावई आला व त्याने स्वत:जवळील चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केला. त्यांच्या दोन्ही मुलींना मारहाण करुन १७ वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने स्वत:बरोबर घेऊन गेला. ही महिला घरी परत आल्यावर तिच्या १५ वर्षाच्या मुलीने ही हकीकत सांगितली. त्यानंतर या महिलेने जावई व मुलीचा शोध घेतला. पण ते मिळून न आल्याने तिने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर ही महिलाही घरातून निघून गेली आहे. त्यामुळे त्यांच्या जावयाचा नेमका पत्ता व अन्य माहिती पोलिसांना नसल्याने पोलिसांना आता फिर्यादीचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण