Pune Crime | कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या खेड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 19:11 IST2023-02-24T19:10:07+5:302023-02-24T19:11:08+5:30
कोयता गँगच्या खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या...

Pune Crime | कोयता दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या खेड पोलिसांनी आवळल्या मुसक्या
राजगुरूनगर (पुणे) : टाकळकरवाडी, भांबूरवाडी, ढोरेवाडी या परिसरात दोन युवकांनी गाड्या, घरांचे दरवाजे फोडून नागरिकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली होती. अशा कोयता गँगच्या खेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. साहिल नाशिकेत टाकळकर (वय २०), प्रतीक दत्तात्रय टाकळकर (वय २२ दोघे रा. टाकळकरवाडी, ता. खेड) यांना खेड पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर शहरालगत टाकळकरवाडी, भांबूरवाडी, ढोरेवाडी या परिसरात साहिल टाकळकर व प्रतीक टाकळकर हे गेल्या काही दिवसांपासून हातात कोयता घेऊन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होते. याबाबत नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. पुढील तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहेत.