शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला पाटबंधारे विभागाची कुरकुंभ एमआयडीसीला नोटीस : उजनी धरणातून घ्यावे पाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:57 IST

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा व्यवस्थेतून पाणी दिले जाते...

ठळक मुद्दे२६ वर्षांनंतर झाली आदेशाची अंमलबजावणी या निर्णयामुळे बारामती परिसराला अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे.खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी

पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राने या पुढे उजनी धरणातूनपाणी घ्यावे आणि सध्याचा वापर देखील उजनीतील पाण्यातूनच करावा असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिले आहे. या निर्णयामुळे बारामती परिसराला अधिकचे पाणी उपलब्ध होणार आहे.जनाई शिरसाई योजनेतून बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील १२ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी ३.६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला उजनी धरणातून पाणी देण्याचे आदेश राज्यसरकारने ९ सप्टेंबर १९९३ रोजी दिले होते. मात्र २६ वर्षे राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणीच झाली नाही. बारामती परिसराला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. येथील भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी विठ्ठल जराड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या प्राथमिक विवाद निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या शेतकऱ्यांनीच ही बाब पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची तातडीने दखल घेत पाटबंधारे मंडळाने या निर्णयाच्या अमंलबजावणीचे आदेश दिले. लोकमतने ३० मे रोजी सर्वप्रथम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राला खडकवासला कालवा व्यवस्थेतून पाणी दिले जाते. या कालव्यातून जनाई-शिरसाईच्या अवर्षणग्रस्त भागाला पाणी उपलब्ध होण्यासाठी यानंतरची कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राची गरज उजनी जलाशयातून भागविण्यात यावी. आपणास आवश्यक असणाऱ्या पाणी कोट्याची मागणी स्वतंत्रपणे उजनी जलाशयातून करण्यात यावी. त्याची माहिती कार्यालयास सादर करावी असे पत्र खडकवासला पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणात मिळून ३३.७७ टीएमसी प्रकल्पीय साठा आहे. जनाई योजने अंतर्गत तीन टप्प्यात बारामती आणि पुरंदरला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. तर, शिरसाई योजनेचा एक टप्पा बारामती व दौंड तालुक्यातील सिंचनासाठी मंजूर करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेKurkumbhकुरकुंभMIDCएमआयडीसीWaterपाणीUjine Damउजनी धरण