चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:12 AM2018-12-19T01:12:23+5:302018-12-19T01:13:09+5:30

नागरिकांची मागणी : खेड तालुक्यात टंचाईची समस्या वाढली

Keep the water in Chasmamen dam safe | चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवा

चासकमान धरणातील पाणी राखीव ठेवा

Next

डेहणे : खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातील पाणीसाठा हिवाळ्यातच निम्म्यावर आला आहे. या वर्षी धरण १०० टक्के भरल्याने शेतकरी व दोन्ही तालुक्यांतील नागरिक आनंदी होते. कालवा नियोजन समितीची बैठक घेऊन धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची व वर्षभराच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्याची मागणी पाणलोट व लाभक्षेत्रातील लाभार्थी शेतकºयांकडून याही वर्षी करण्यात आली. मात्र, आदिवासी भागातील शेतकºयांच्या दुर्दैवाने साठा शिल्लक राहील की नाही, याचा विचार न करता पूर्व भागातील सदस्यांचा भरणा असलेल्या कालवा नियोजन समितीने ३ नोव्हेंबरपासून सलग ९५ दिवसांचे आवर्तनाला मंजुरी देत आदिवासी भागातील शेतकºयांवर अन्याय केला. रब्बीचे पीकच नसल्याने दुष्काळाचे सावट पडलेला हा भाग आताच पाणीटंचाईने हैराण झाला आहे. यामुळे धरणातील पाणी राखीव ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भीमा नदीवर ८.५३ टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण म्हणजे खºया अर्थाने दोन्ही तालुक्यांसाठी वरदान आहे. चासकमान धरण झाल्यापासून आजतागायत फक्त २०१५चा अपवाद वगळता दर वर्षी धरण शंभर टक्के भरलेले आहे. मात्र, पाणीसाठा मुबलक असूनही दर वर्षी नियोजनाअभावी अमर्यादपणे पाणी आवर्तनात सोडल्याने मे महिन्याच्या अखेरीस धरणाचा पाणीसाठा उणे स्थितीत पोहोचतो. चालू वर्षी पावसाने वेळेवर व दमदार हजेरी लावली. पश्चिम भागात सलग तीन महिने पाऊस पडत राहिला. पयार्याने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी जुलै महिन्यातच धरणाचे दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. मागील वर्षी १४ आॅगस्टला, तर चालू वर्षी ७ जुलै रोजीच म्हणजेच ७ दिवस आधीच धरण शंभर टक्के भरले. बोटा्वर मोजण्याइतके दोन बंधारे वगळता पाचही लघु प्रकल्प यंदा कोरडेच आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच पिण्याची पाण्याची ओरड सुरू झाली आहे.

परतीच्या पावसाने भाताला दिलेला तडाखा, धरणात पाणी नसल्याने वाया गेलेला रब्बी हंगाम व आता जनावरे आणि माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, असे भयानक दुर्भिक्ष असताना शिरूर भागातील उसाला पाणी देण्यासाठी शिरूरबरोबर खेडचे सर्वच नेते एकवटल्याने आदिवासी भागातील शेतकरी मात्र दुष्काळात होरपळून निघत आहेत. पाण्याच्या आवर्तनावर नायफड-वाशेरे गटातील सर्व पुढारी मूग गिळून बसल्याचे चित्र आहे. खेडच्या जलसंपदा विभागाचे कार्यालयात निवेदन देत अदिवासी महासंघाचे अध्यक्ष गेणभाऊ वाजे, राष्ट्रवादी युवकचे किरण वाळुंज, जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्य तुकाराम भोकटे, चिखलगावचे सरपंच रामदास मुके, धुवोलीचे सरपंच पांडुरंग जठार, माजी सभापती रामदास माटे व आदिवासी भागातील शेतकºयांनी धरणातून शिल्लक पाणी पिण्यासाठी ठेवण्याची मागणी केली आहे. हा अत्यल्प साठा असल्याने खेडचीच तहान पूर्ण होऊ शकत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाण्याचे आवर्तन सुरू राहिल्यास नायफड-वाशेरे विभागातील लोकप्रतिनिधींबरोबर आमदारांना आदिवासी जनतेच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. एवढे पाण्याचे दुर्भिक्ष असताना कुणी पिण्याच्या नावाने उसासाठी पाणी पळविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी उपस्थित शेतकºयांनी दिला. त्यामुळे यंदा आदिवासी पट्ट्यात पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिल्लक साठ्यात फसवणूक...
४चासकमान ते भोरगिरी या ४० किलोमीटर परिसरात पसरलेल्या व ४५ मीटर उंचीच्या या धरणाची ८.५३ टीएमसी क्षमता आहे. सुरुवातीच्या काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीपात्रात खोलवर पाणीसाठा करणारे डोह होते; परंतु आता हे डोह प्रचंड प्रमाणात गाळाने भरले आहे. पर्यायाने जलसंपदा खात्याचा शिल्लक मृतसाठा फसवा आहे. पूर्वी तिसºया आवर्तनानंतरही पाणीसाठा शिल्लक राहत होता; परंतु आता दुसºया आवर्तनातच पाण्याने तळ गाठला आहे.

तालुक्यातील चासकमान धरणात आदिवासी बांधवांनी हजारो हेक्टर जमीन दिली. मात्र, या भूमिपुत्राला त्याच्या हक्काचे पाणी मिळू नये, ही शोकांतिका आहे. दर वर्षी नियम व कालवा नियोजन समितीचा निर्णय असल्याचे सांगून पाणी पळवण्याचा घाट घातला जातोे; परंतु यापुढे अदिवासी भागातील शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या भूमिकेतआहेत. वेळीच आवर्तन थांबवले नाही, तर या भागात लोकप्रतिनिधींना फिरकू दिले जाणार नाही.
- गेणभाऊ वाजे, अध्यक्ष, अदिवासी महासंघ पुणे जिल्हा

Web Title: Keep the water in Chasmamen dam safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.