कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 07:44 PM2019-03-01T19:44:15+5:302019-03-01T19:49:07+5:30

दिवसेंदिवस रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता.

Katraj - Dehuroad bypassing of six lanes : 223.46 crores sanctioned | कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर

कात्रज - देहूरोड बायपास होणार  सहा पदरी : २२३.४६  कोटी निधी मंजूर

Next
ठळक मुद्देखा. सुप्रिया सुळे यांचा सातत्याने पाठपुरावा देहूरोड बायपास मार्गावर वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होऊन देखील दुर्लक्ष

पुणे : पुणे शहरातून जाणारा मुंबई महामार्ग वाढत्या वाहतूक कोंडीमुळे कात्रजवरून बाह्यवाहतूक वळण मार्ग काढण्यात आला. तसेच पर्यायी  मार्ग म्हणून कात्रज नवीन बोगदा मार्गे वाहतूक वळविण्यात आली. त्याच कारणाने या देहूरोड बायपास मार्गावर वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होऊन देखील दुर्लक्ष होऊ लागले. मात्र, याचा वारंवार पाठपुरावा करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरव्यामुळे सदर महामार्गाचे रुंदीकरणासाठी ९६.७७ कोटी व कात्रज चौकातील पूलासाठी १२६.६९ कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे. 
दिवसेंदिवस रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत पार्किंग व अधिक अनधिकृत दुकाने यामुळे महामार्ग रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला होता त्यामुळे अपघाताची संख्या वाढत होती. बऱ्याच वेळा प्रशासनाला दुरुस्तीसाठी सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात होते.परंतु, या मार्गाचे सहा पदरी करणामुळे रस्ता रुंद सुरू होऊन महामार्ग वाहतुकीस योग्य ठरेल या महामार्गावरील गरजेनुसार रस्ते किंवा भुयारी मार्ग तयार केले .मात्र, त्यानंतर या रस्त्याचा विकास किंवा रुंदीकरण किंवा भुयारी मार्गाची निर्मिती न केल्याने वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले होते. आंबेगावला जोडणारा दत्तनगर येथे राजमाता भुयारी मार्ग वाढत्या लोकसंखेमुळे कमी पडू लागला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण कोणी करायचे याबाबत मतभेद असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाले नव्हते त्यास अखेर मुहूर्त मिळाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरा्यामुळे 3.88 किलोमीटर लांबीच्या कात्रज ते वडगाव नवले ब्रीज सहापदरी रस्त्याच्या कामासाठी 96.77 कोटी व कात्रज चौकातील फ्लाय ओव्हर उभारणीसाठी 126.69 कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याने काही दिवसात या वाहतूक कोंडीतून सुटका होणार हे निश्चित झाले आहे.
याबाबत महामार्ग प्रशासनाचे अधिकारी गणेश चौरे यांनी सांगितले की ,कात्रज ते नवले पूल या बायपास महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरण तसेच दोन्ही बाजूने दोन पदरी सेवा रस्त्याचे तसेच आंबेगाव शिवसृष्टी आणि दत्तनगर येथील भुयारी मार्गाचे रुंदीकरण, तसेच दोन पादचारी मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही दिवसात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कात्रज येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता, त्याला यश लाभले.असून वडगाव नवले ब्रीज ते कात्रज चौक या ६ पदरी रस्त्यासाठी निधीला मंजुरी मिळाली आहे.या उपाययोजनांमुळे आता वाहतूक कोंडी होणार नाही.वाढत्या शहराचा विकास व पायाभूत सुखसुविधा देण्यावर माझा कटाक्ष असेल.
..................

Web Title: Katraj - Dehuroad bypassing of six lanes : 223.46 crores sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.