शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live : भाजपच्या हेमंत रासने यांची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:56 IST

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live

Kasba Peth Vidhan Sabha Election Result 2024 Live  :  पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजप महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत होत आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपच्या गडाला हादरा देत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

आजच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच कसब्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ६४० मतांची आघाडी घेत भाजपला सुरुवातीला धक्का दिला. या फेरीत धंगेकरांना ५,२८४ मते मिळाली, तर रासने यांना ४,६४४ मते मिळाली होती.

इथे क्लिक करा >   महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल  २ ० २ ४  -   

मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये भाजपच्या हेमंत रासने यांनी जोरदार मुसंडी मारली. चौथ्या फेरीपर्यंत त्यांनी ६,४१५ मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काँग्रेसकडे निराशेची छटा दिसत आहे.

कसब्याचा निकाल भाजपसाठी प्रतिष्ठेचा

कसब्यातील हा निकाल भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपने मोठ्या प्रमाणावर ताकदीनिशी प्रचार राबवला होता. रासने यांचा विजय हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न असून, धंगेकरांसाठी हा निकाल जनतेच्या विश्वासाची परतफेड मानला जात आहे.

कसबा मतदारसंघातील या चुरशीच्या लढतीचा निकाल पुण्यासह संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो. दुपारी तीनपर्यंत २० फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अंतिम निकाल हाती येईल. आता रासने आपली आघाडी कायम ठेवतात की धंगेकर पुन्हा एकदा पुनरागमन करतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024kasba-peth-acकसबा पेठravindra dhangekarरविंद्र धंगेकरBJPभाजपाcongressकाँग्रेस