शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अलंकापुरीत कार्तिकी एकादशीला लाखो भाविकांचे स्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 1:29 PM

श्री पांडुरंगरायाच्या पादुकांची ग्रामप्रदक्षिणा; इंद्रायणीत पादुकांना स्नान

ठळक मुद्देअलंकापुरीत आलेल्या भाविकांनी नदीवर स्नानास, तसेच श्रींचे दर्शन व महापूजेस गर्दी

आळंदी : माऊलींच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी एकादशी उद्या शनिवारी (दि. २३) लाखो भाविकांच्या उपस्थितीत आळंदीत  साजरी होत आहे. यानिमित्त माऊलींची पालखीची नगरप्रदक्षिणा होत आहे. दरम्यान, दशमीदिनी शुक्रवारी (दि. २२) श्री पांडुरंगरायाच्या पादुकांच्या ग्रामप्रदक्षिणेत इंद्रायणी नदीवर श्रींच्या पादुकांना हरिनामगजरात स्नान घालण्यात आले. राज्य परिसरातून अलंकापुरीत आलेल्या भाविकांनी नदीवर स्नानास, तसेच श्रींचे दर्शन व महापूजेस गर्दी केली.  आळंदी यात्रेतील परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात शुक्रवारी (दि. २२) श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य झाला. वीणामंडपात हभप गगुकाका शिरवळकर व हभप धोंडोपंतदादा अत्रे यांच्यावतीने कीर्तनसेवा झाली. धुपारतीनंतर हभप वासकरमहाराज व हभप वाल्हेकरमहाराज यांच्यावतीने  हरिनामगजरात कीर्तन झाले. व्यवस्थापक माऊली वीर यांनी दर्शनबारी भरली असून, पुढील बारी भक्ती सोपान पुलावरून पुढे इंद्रायणी नदीकडील तात्पुरत्या दर्शन बारी मंडपात पोहोचली असल्याचे सांगितले. भागवत धर्मप्रचारक आश्रमात हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे सुश्राव्य ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या विषयावर प्रवचनसेवेस सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी प्रवचनास गर्दी केली. भाविकांनी प्रवचनसेवेस उपस्थित राहण्याचे आवाहन पुरुषोत्तममहाराज पाटील यांनी केले आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ही सेवा होणार असल्याचे त्यांनी सांगितले............आज आळंदीत कार्तिकी एकादशी४आळंदी मंदिरात शनिवारी (दि. २३) कार्तिकी वारीतील मुख्य भागवत एकादशी साजरी होत असल्याचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले. वारकरी संप्रदायात परंपरेने भागवत एकादशी साजरी केली जाते. त्यानुसार आळंदीत २३ नोव्हेंबरला एकादशी साजरी केली जात आहे. यानिमित्त शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे १२ ते ३ या कालावधीत श्रींची परंपरेने पहाटपूजा होणार आहे. यात पवमान अभिषेक व दुधारती, ११ ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात पहाटपूजा होणार आहे. दुपारी एकादशीदिनी फराळाचा महानैवेद्य झाल्यानंतर श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा करण्यात महाद्वारातून बाहेर येईल. त्यानंतर दुपारी हरिहरेंद्र मठाजवळील दर्शनबारीतून पासधारकांची २ ते ६ या वेळेत दर्शनव्यवस्था होईल.............

 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर