शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कांबळी की कोल्हे? नियामक मंडळाच्या सदस्यांची ‘गोची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 7:45 PM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकीत प्रसाद कांबळी हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना आता अभिनेते अमोल कोल्हे अधिकृत घोषणा करण्यात आल्याने अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे.

ठळक मुद्देशरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठीसोमवारी (दि.१९) अर्ज भरले जाणार

पुणे : मोहन जोशी पँनलकडून अभिनेते अमोल कोल्हे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांसह नाट्य वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रसाद कांबळी हे अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात असताना कोल्हे यांचे नाव पुढे आल्याने अध्यक्षपदाची लढत रंगणार आहे. मात्र, कोल्हे यांच्या नावामुळे त्यांच्याशी संबंधित पक्षाच्या सांस्कृतिक पदावरील कांबळींना पाठिंबा दर्शविणाऱ्या नियामक मंडळाच्या सदस्यांची चांगलीच ‘गोची’ झाली आहे.        अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीआधी झळकलेल्या फलकांमध्ये अमोल कोल्हे यांचा चेहराच समोर आणण्यात आला होता. त्यामुळे मोहन जोशींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी कोल्हे यांचे नाव पुढे येईल असा एक अंदाज होता आणि अपेक्षेप्रमाणे तसेच झाले. कोल्हे यांचे नाव घोषित करण्यासाठी आयोजित बैठकीत मोहन जोशी पॅनलचे सुमारे ४० जण उपस्थित राहिल्यामुळे अध्यक्षपदासाठी आवश्यक ३१ संख्याबळाचा आकडा जोशी पॅनलकडून ओलांडला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाट्य परिषदेवर कोल्हे यांच्या रूपात अप्रत्यक्षपणे मोहन जोशी यांचेच प्राबल्य राहील,असे बोलले जात आहे.     दुसरीकडे प्रसाद कांबळी यांनी अध्यक्षपदासाठी चांगलेच ‘सेटिंग’ लावले आहे. शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनी अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.मुंबईत शिवसेनेचे सांस्कृतिक प्राबल्य असून डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे सदस्य आहेत. सुरूवातीपासूनच कांबळी याच्या नावाला नियामक मंडळावर निवडून आलेल्या काही मंडळीनी पाठिंबा दर्शविला आहे.त्यातीलच काहीजण पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीशी संबंधित आहेत. त्यामुळे या परिस्थितीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नियामक मंडळाच्या काही जणांची अनौपचारिक बैठक झाली. त्याबाबत कोणतीही वाच्यता करण्यास त्यांनी नकार दर्शविला. सोमवारी (दि.१९) अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जाणार आहेत, त्यानंतर बोलू असे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेMohan Joshiमोहन जोशीSharad Pawarशरद पवारShiv Senaशिवसेना