शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:32 IST

नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म ) ता खेड ) येथील अपेक्षा वसंत मांजरे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत  फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅण्डल मोर्चा काढला होता.

आरोपी नवनाथ कैलास मांजरे ( वय २९ रा मांजरेवाडी धर्म ता खेड ) या नराधमाने अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यात टाकला.या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंह, सुखदेव यांच्या स्मृतिस्थळापासून मांजरेवाडी धर्म, मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी तहसिलदार कचेरीपर्यत कॅन्डल मार्च मोर्चा काढला. कुटुंबियांच्या व ग्रामस्थांच्या वतीने या आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांना निवेदन देण्यात आले. या कामी पोलीस प्रशासनाच्या वतीने तपासामध्ये कुठल्याही प्रकारची कुसुराई न ठेवता योग्य व न्यायिक पद्धतीने तपास होऊन नराधमाला फाशीच होईल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील विजय डोळस, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी राक्षे,विजयाताई शिंदे , अश्विनी पाचारणे, वंदना सातपुते शहरातील विविध संस्थांच्या महिला यावेळी उपस्थित होत्या. पंचक्रोशीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर नराधम आरोपी संशयित म्हणून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर खुनाची कबुली दिली. मात्र अत्याचार संदर्भात पोलिसांची दिशाभुल करत असल्यामुळे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने बलात्कार करुन खुन केल्याचे समोर आल्याने ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या होत्या.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडDeathमृत्यूPoliceपोलिसagitationआंदोलनWomenमहिला