शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

पुण्यात जावायानेच घेतला सासऱ्याच्या गालाचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:56 AM

जावयाच्या घरी चहापाणी घेतल्यानंतर सासरे मच्छिंद्र आणि जावई खंडूमध्ये पुन्हा वादावादी झाली.

हडपसर : जावायाने किरकोळ कारणावरुन सासºयाच्या गालाचा  चावा घेतल्याची घटना  हडपसरमध्ये घडली आहे. या प्रकरणी दोघांनी हडपसर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, खंडू संतराम चौधरी (२८, रा. काळेपडळ, हडपसर) असे जावयाचे नाव आहे. तर मच्छिंद्र येडूबा शिंदे (रा. पाटोदा बीड) असे सासºयाचे नाव आहे. खंडू आणि राणीचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले आहे. मात्र, जावई मुलीशी फोनवर बोलू देत नसल्याने सासरे मच्छिंद्र आणि खंडू यांच्यात फोनवर बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने खंडूने सासºयाला पुण्यात यायला सांगितले. त्यानुसार पाटोदा येथून सासू-सासरे आणि एक नातेवाईक खंडूच्या हडपसर येथील घरी आले होते. 

जावयाच्या घरी चहापाणी घेतल्यानंतर सासरे मच्छिंद्र आणि जावई खंडूमध्ये पुन्हा वादावादी झाली. त्यावेळी मच्छिंद्रने मुलीला फोनवर बोलू का देत नाही अशी विचारणा जावई खंडूला केली. त्याचा राग आल्याने खंडूने थेट सासरेबुवांच्या अंगावर धावून जात त्यांच्या गालाचा करकचून चावा घेतला. तसेच हाताच्या बोटाचा चावून तुकडा पाडला. मच्छिंद्रला गंभीर जखमी केल्यामुळे खंडूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुलीसोबत बोलणे होऊ देत नसल्याच्या कारणावरुन मच्छिंद्रसह पत्नी राणी, सासूने खंडूला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून  जावई आणि सासरे यांच्यात भांडणे झाली त्याचा राग आल्याने जावायाने सासºयाच्या गालाचा आणि हाताचा चाका घेतला. तसेच पत्नी, सासºयासह इतर नातेवाईकांनी जावयाला मारहाण केली आहे. त्यानुसार परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी