शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जर्मन प्राध्यापकांची चिकाटी वाखाणण्यासारखीच; भारतीय विद्यार्थ्याचा विलक्षण अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 20:35 IST

संकट झेलून त्यानंतरही दिलेले काम निष्ठेने करण्याचा जर्मन नागरिकांचा स्वभावच

ठळक मुद्दे 'कोरोना'तही नव्या दिशेने वाटचाल करण्याची जिद्द

राजू इनामदारपुणे: संकट झेलून त्यानंतरही दिलेले काम निष्ठेने करण्याचा जर्मन नागरिकांचा स्वभावच आहे. तेथील प्राध्यापकही याला अपवाद नाहीत. शिक्षणाच्या निमित्ताने तिथे असलेल्या अनिकेत साठे या पुणेकर विद्यार्थ्याने याबाबत त्याला आलेला अनूभव लोकमत ला सांगितला.अनिकेत म्हणाला, मी सध्या फ्रँकफुर्ट युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस मध्ये मास्टर्स करीत आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये आमचे विंटर सेमिस्टर नुकतेच संपले. भारतासारखीच जर्मनी मध्ये सुद्धा २ सेमेस्टर्स च्या मध्ये एक महिन्याची सुट्टी असते. त्या सुट्टीमध्ये आमच्या युनिव्हर्सिटीत माझा '९ मार्च ते ४ एप्रिल' जर्मन भाषेचा क्लास होता. पहिला आठवडा व्यवस्थित पार पडला. पण कोरोना विषाणूचा प्रसार जर्मनी मध्ये वाढत गेल्याने जर्मन क्लास लवकरच बंद होईल असे वाटत होते. मला जर्मन भाषा शिकायची होती व हाताशी हाच महिना होता. त्यातच 'हेसेन राज्यातील सर्व शाळा आणि युनिव्हर्सिटी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील' अशी बातमी १९ मार्चला प्रसिद्ध झाली. त्यामुळे जर्मन क्लास आता काही होत नाही असे मी धरूनच चाललो होतो. थोडे वाइटही वाटत होते.अनिकेत पुढे म्हणाला,  पण जर्मन लोकांची चिवट वृत्ती आणि वक्तशीरपणा ह्याला तोड नाही. १९  मार्च रोजीच संध्याकाळी मला आमच्या युनिव्हर्सिटी कडून एक ई-मेल आला, कि २० मार्च पासून आमचा जर्मन क्लास ऑनलाईन नेहमीच्या वेळेत सुरु राहील. आमच्या जर्मन क्लासच्या शिक्षिकेने झूम अँप वर सगळ्या विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून ठेवला होता. त्यावर दररोज पीडीएफ च्या द्वारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले होते. आता एखादी भाषा शिकायची म्हणजे संवाद साधणे हे महत्वाचे. झूम अँप वर ब्रेक-आऊट रूम चा वापर करून २ विद्यार्थ्यांमध्ये संभाषण करवणे, त्यांना त्यासाठी विषय आणि शब्द पुरवणे असे निरनिराळे उपक्रम त्यांनी सुरु केले. खरंतर आमच्या जर्मन शिक्षिका थोड्या वयस्कर होत्या, पण झूम अँप आणि त्यातील निरनिराळी वैशिष्ट्ये कशी वापरावीत हे त्यांनी एका दिवसात आत्मसात केले होते. कोरोनामुळे क्लास बुडणार म्हणून वाईट वाटलेला मी ती जिद्द पाहून थक्क झालो. ४ एप्रिल रोजी आमची जर्मन भाषेची ऑनलाईन परीक्षासुद्धा झाली. माझ्या शैक्षणिक आयुष्यात असा वर्ग मी पहिल्यांदा अनुभवला होता. जर्मन भाषेबरोबर अजून काहीतरी वेगळे मला शिकायला मिळाले होते. आज दि. १४ एप्रिल २०२०, कोरोना विषाणूचा थैमान चालूच आहे. पण तुमच्याकडे जर का सकारात्मक वृत्ती असेल तर अशा 'वैश्विक महामारीचा' काडीमात्रसुद्धा  फरक तुमच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकत नाही.अनिकेत ने सांगितले, नुकतेच युनिव्हर्सिटी कडून एक बातमीपत्र आले.  'विअर गेहेन नॉय् वेगं' -  'आम्ही नव्या दिशेने पुढे वाटचाल करत आहोत' अश्या शब्दात सुरवात करत २० एप्रिल २०२० पासून फ्रँकफुर्ट युनिव्हर्सिटीचे पुढचे सेमिस्टर ऑनलाईन रित्या सुरु होईल अशी घोषणा त्यांनी केली. जे विद्यार्थी अशा परिस्थितीत जर्मनीच्या बाहेर अडकले आहेत त्यांना ह्या बातमीने दिलासा मिळाला आहे.

..................फ्रँकफुर्ट इंडियन स्कॉलर्स अससोसिएशन (फीसा) ही संस्था जर्मनी मध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. अनिकेतही या संस्थेचा सदस्य झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, जर्मनीत राहणाऱ्या भारतीय विद्यर्थ्यांना असलेले प्रश्न आणि शंका सोडवण्यासाठी दर रविवारी संस्था ' ऑनलाईन कॉफी कॉर्नर' आयोजित करते. त्यामध्ये गेस्ट स्पीकर बोलावतात. ते भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा, जॉब, आर्थिक मदत, वैद्यकीय सेवा, आरोग्य योजना अशा विषयांवर सल्ले देतात आणि त्यांना असलेल्या अडचणी सोडवतात. 'विअर गेहेन नॉय् वेगं' नव्या दिशेने वाटचाल हेच आता संस्थेनेही बोधवाक्य म्हणून स्विकारले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGermanyजर्मनीStudentविद्यार्थी