शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:31 IST

नारायणगाव येथील एका लग्न सोहळ्याला लावली उपस्थिती, त्या लग्नातील 23 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

ठळक मुद्देनारायणगाव येथे झालेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थितसंपर्कात आलेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन

नारायणगाव : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार अतुल बेनके यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना पुढील उपचारासाठी चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे,अशी माहिती आमदार बेनके यांच्या सचिवांनी दिली आहे .

नारायणगाव येथे बुधवारी (दि.२६) कोविड -१९ उपाययोजना संदर्भात आयोजित आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी सौरभ कोडोलकर, पोलीस उपअधीक्षक दीपाली खन्ना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापुरकर , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार ,तहसीलदार हनुमंत कोळेकर ,जुन्नरचे मुख्याधिकारी मछिंद्र घोलप ,सभापती विशाल तांबे ,गट विकास आधिकारी हेमंत गरीबे , कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर,आरोग्य आधिकारी डॉ. उमेश गोडे ,डॉ वर्षा गुंजाळ आदी अनेक प्रशासकीय आधिकारी उपस्थित होते. गुरुवारी (दि.२७) त्यांना त्रास झाल्याने पुण्यात कोरोनाची तपासणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.   

नारायणगाव येथील हॉटेल ओसरा येथे १३ ऑगस्ट रोजी झालेला विवाह सोहळ्यास बेनके यांनी उपस्थिती दर्शविली होती. या विवाह सोहळ्यातील २३ जण गेल्या तीन दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

संपर्कात आलेल्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे .

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMLAआमदारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarriageलग्न