शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जुन्नरचा पर्यटन विकास कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 01:28 IST

ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले.

पुणे - ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि सांस्कृतिक, नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्टया नटलेल्या जुन्नर तालुक्याला राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यत आले. मात्र, या संदर्भातील अध्यादेश काढल्यानंतर शासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्नरचा पर्यटनाच्या अंगाने होणारा विकास कागदावरच आहे.जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल,अशी अपेक्षा होती.मात्र,अद्याप जुन्नरचा विकास आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच या भागात कोणत्या सोई-सुविधा सुरू करणे आवश्यक आहे. हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, जुन्नर तालुक्यामध्ये केवळ एक केंद्र सुरू आहे.जुन्नरचा विचार करता या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला व इतर ऐतिहासिक किल्ले आहेत.तसेच १५० वर्षाची परंपरा असलेला अणे उत्सव असून ३५० वर्षाची परंपरा असलेला बेल्हे गावचा आठवडे बाजार आहे.त्याचप्रमाणे खोडद येथे जागतिक महादूर्बिण आहे.1 जुन्नर तालुक्यात शिवनेरीसह निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले आहेत. सर्वाधिक ३५० लेण्या असून अष्टविनायकापैकी लेण्याद्री,ओझर ही दोन अष्टविनायक मंदिरे आहेत.तसेच ३ हेमाडपंथी बंधणीतील कोरीव पुरातन मंदीरे आहेत. तसेच नाणेघाट-घाटघर, दर्याघाट, आणेघाट- आणे असे निसर्ग रम्य घाट व प्रसिध्द धबधबे आहेत.2 त्याचप्रमाणे विविध पठारे तसेच गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फुट खोल असलेले कोकणकडे आहेत. पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक लहान मोठी ठिकाणे जुन्नरमध्ये आहेत. त्यात माणिकडोह गावातील कुकडी नदी, पुरातन काळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख बोरीगावत आहे. तमाशाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे नारायणगाव ,बिबट्या निवारण केंद्रही पर्यटकांना आर्कषित करते.3 एमटीडीसीने जुन्नरमध्ये विविध विकास कामे हाती घेण्यासाठी काही जागांची पाहाणी केली आहे. तसेच तज्ज्ञांच्या सहकार्याने या तालुक्याचा विकास आराखडा तयार केला जाणार होता. मात्र,अद्याप आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झालेले नाही,अशी माहिती सूत्रांनी दिली.पर्यटन व्यवसायाला चालना मिळाल्यास त्याचा फायदा संबंधित गाव व जिल्ह्याला मिळत असला तरीदेखील कुचकामी सरकारीयंत्रणेमुळे काही खासगी व्यावसायिकांची अरेरावी पर्यटनस्थळांवर दिसून येते.गेल्या काही वर्षांमध्ये इको टूरिझमची संकल्पना वाढीस लागली असताना त्या संकल्पनेचे योग्य व्यवस्थापन नसल्याने सध्या पर्यटकांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पर्यटन स्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी)खासगी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली जाते.जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आज घडीला केवळ एक केंद्र सुरू असल्याचे चित्र पाहायलामिळत आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरtourismपर्यटन