जुन्नरला सराफाचे घर चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:52 AM2018-08-28T01:52:28+5:302018-08-28T01:52:49+5:30
येथील बोडकेनगरमधील जिजामाता सोसायटीत एका सराफ व्यावसायिकाच्या बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन किलो चांदी,
![Junnar broke the house of bullion with thieves | जुन्नरला सराफाचे घर चोरट्यांनी फोडले Junnar broke the house of bullion with thieves | जुन्नरला सराफाचे घर चोरट्यांनी फोडले](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/thief_2017084696.jpg)
जुन्नरला सराफाचे घर चोरट्यांनी फोडले
जुन्नर : येथील बोडकेनगरमधील जिजामाता सोसायटीत एका सराफ व्यावसायिकाच्या बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन किलो चांदी, तसेच एक लाख ७५ हजार रुपये रकमेची चोरी केली. याबाबत सराफ व्यावसायिक यशवंत नारायण मंचारकर यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की यशवंत मंचारकर हे देवदर्शनासाठी दोन दिवस परगावी गेले असल्याने चोरट्यांनी डाव साधला. मंचारकर दोन दिवसांनी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बंद घराचा व बेडरूमच्या दरवाजाचा कोयंडा तोडून बेडरूमच्या कपाटातून २ लाख रुपये किमतीचे चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यामध्ये चांदीचे पैंजण, चेन, जोडवी, मासोळ्या, बिचवे, अंगठ्या असे दागिने होते. तर १ लाख ७५ हजार रुपये रोख रकमेची चोरी झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी भेट देऊन पाहणी केली. चोरीच्या घटनेमुळे येथील नागरिक धास्तावले आहेत.