शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील न्यायालयीन कामकाज आठ जूनपासून होणार पूर्ववत सुरु; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 16:23 IST

50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज सुरु होणार

ठळक मुद्देसकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत कोर्टाचे कामकाज चालणार

पुणे : लॉकडाउनमुळे बंद असलेले न्यायालयीन कामकाज येत्या आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये सुरु होणार आहे. न्यायालयात होणारी गर्दी कमी राहावी म्हणून 50 टक्के न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु होणार आहे. मुंबई हायकोर्टाने याबाबत राज्यातील सर्व न्यायालयांनी सूचना दिल्या आहेत.

लॉकडाउनमुळे 23 मार्चपासून न्यायालयीन कामकाज बंद होते. फक्त तातडीच्या दाव्यांवर न्यायालयात सुनावणी सुरु होती. आठ जूनपासून दोन शिफ्टमध्ये कोर्टाचे कामकाज सुरु होणार होणार आहे. सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत कोर्टाचे कामकाज चालणार आहे. 50 टक्के न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत न्यायालयीन कामकाज सुरु होणार आहे.प्रमुख न्यायाधीश न्यायालयीन कामाच्या वेळा बदलू शकतात. मात्र शिफ्टच्या वेळा बदलू शकत नाहीत.न्यायाधीशांनी कोटार्तील कामकाज करताना 15 पेक्षा जास्त मँटर बोर्डवर घेऊ नये. पक्षकारांच्या अनुपस्थितीत आदेश देऊ नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड सतीश मुळीक म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील न्यायालये सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याबाबत उपाययोजना आणि सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्येक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश तेथील परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहेत. पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रमुख न्यायाधीशांबरोबर लवकरच बैठक घेणार आहेत.

......सुचविण्यात आलेल्या उपाययोजना: 

- प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे.- सँनिटायझर, पाणी, साबण याची सुविधा हात स्वच्छ करण्यासाठी उपलब्ध करावी- कोर्ट हॉल स्वच्छ करण्यात यावेत.- कम्पुटरचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शक्यतो इतरांना कम्पुटर वापरु देऊ नये.- कोर्टाच्या परिसरात किऑस्कच्या वापरामुळे संसर्ग होऊ नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत किऑस्क बंद ठेवावेत.- कोर्टातील स्वच्छतेबाबत निगराणी आणि पाहणी करण्यासाठी न्यायिक अधिकारी नेमावेत.- स्वच्छेचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार......

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसadvocateवकिलPoliceपोलिसMumbai High Courtमुंबई हायकोर्ट