शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

विधानसभेच्या विजयाकरीता जे. पी. नड्डा यांचे दगडूशेठ गणपतीला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 3:46 PM

विधानभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळावे यासाठी भाजपाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दगडूशेठ चरणी प्रार्थना केली.

पुणे : भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो,आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो, संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली.

नड्डा हे पुण्याच्या दैाऱ्यावर असून त्यांनी आज दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जे.पी.नड्डा यांचे  स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा चे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतिश, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय पुण्याचे खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक यांसह स्थानिक नगरसेवक व भाजपा चे पदाधिकारीही उपस्थित होते. 

पुण्यामध्ये लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अभिषेक देखील केला. यामध्ये आगामी निवडणुकीत भाजपा ला यश मिळू देत, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले. त्यानंतर गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन अशोक गोडसे व हेमंत रासने यांनी नड्डा यांचा सन्मान केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर