शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

पत्रकारांनी सत्य तेच मांडावे, कोणाच्या दमदाटीवरुन, सुचनेवरुन लेखणी चालवू नये- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 21:15 IST

बारामतीत व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन.

बारामती- पत्रकारीतेमध्ये आज अनेक नवीन आव्हाने आहेत. एकंदरीत आज देशातील माध्यमांशी स्थिती बदलली आहे. पत्रकाराला स्वतः चे मत मांडायला, भूमिका घ्यायला वाव कमी आहे, असे वातावरण आहे. मात्र, पत्रकारांनी सत्य, योग्य असेल तेच मांडावे. कोणाच्या दमदाटीवरुन,सुचनेवरुन लेखणी चालवु नये,असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती येथे आयोजित पत्रकारांच्या ‘व्हाइस आॅफ मिडीयाच्या राज्य शिखर अधिवेशनात ते बाेलत होते.यावेळी कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे,खासदार कुमार केतकर,ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार,जयश्री खाडीलकर,प्रकाश पोहरे,कुमार सप्तर्षी,माजी  मंत्री हर्षवर्धन पाटील,कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार आदी  उपसथित होते.

यावेळी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील सारस्वतांचा,वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या व्यक्तींचा  व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ नेते  पवार, माजी केंद्रीय मंत्री  सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री पवार बोलत होते.

ते म्हणाले की, पत्रकारांच्या अधिवेशनाला खूप वेळा उपस्थीत राहिलो आहे.माझे महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांशी घनिष्ठ संबंध होते. स्व.नीळकंठ खाडिलकर यांनी अनेक वेळा मुलाखती घेतल्या. राजनीती पहिले वर्तमानपत्र काढले. नेता , काॅंग्रेस पत्रिका, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केल्याच्या गमतीदार आठवणींना पवार यांनी उजाळा दिला.

माजी केंद्रीय मंत्र सुशीलकुमार शिंदे म्हणाले, गेल्या तीन - चार वर्षात देशाची सामाजिक परिस्थीती बिघडत आहे. त्यात सुधार करण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. त्यात पत्रकारांची भूमिका मोठी राहणार असल्याचे शिंदे म्हणाले.

खासदार कुमार केतकर यांचे यावेळी भाषण झाले. जाती -पाती मध्ये जाणीवपूर्वक संघर्ष पेटविले जात आहे. आज जगातील पत्रकारिता अडचणीत आली असून ती स्वतंत्र नाही.२०२४ मध्ये देशातील वातावरण चिघळू शकेल अशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुका ह्या ट्रेलर आहेत. नंतर पिक्चर मोठा राहणार असल्याचे केतकर म्हणाले.

संपुर्ण देशाचे चित्र समोर ठेवल्यास मोदींच्या नेतत्वातील भाजप शासित राज्य कमी आहेत. देशात ६० टक्केपेक्षा अधिक देशातील राज्य आज भाजपच्या हातात नाही. गोवा मध्ये तोडफोड झाली, महाराष्ट्र मध्ये काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली.यानंतर होणार्या निवडणुकीत लोक काय निर्णय घेतील,याबद्दल  बोलणे योग्य ठरणार  नाही.मात्र, देशातील बदल स्पष्ट दिसत आहे.या सगळ्या स`थितीत  लोकांची अस्वस`थता मांडण्यासाठी पत्रकारीता हे एकमेव माध्यम आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रमाणे पत्रकारीतेची आज खरी गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.दरवर्षी पंतप्रधान दिवाळी सण काश्मीरमध्ये जवानांबरोबर घालवतात,असे चित्र आपण पाहतो.  ६ वर्षापुर्वी पंतप्रधानमंत्र्यांनी काश्मीरला जाऊन काश्मीरचा चेहरा बदलणारे कार्यक्रम जाहीर केले.त्यानंतर ते ५ वर्ष  दिवाळीत काश्मीरला गेले.मात्र, दरवेळी जवानांबरोबर वेळ दिला.मात्र,काश्मीरच्या लोकांचे मुलभुत प्रश्नासाठी  जनतेसमोर कार्यक्रम मांडले,त्यातील एकाही कार्यक्रम कोणत्याही प्रकारे  सोडवणुक करण्यासाठी पाऊल टाकले नाही,असा अनुभव अनेक वेळचा आहे,याही दिवाळीचा सुध्दा तो आहे.त्यामुळे चित्र गंभीर असल्याची चिंता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Baramatiबारामती