नोकरीच अशी तर धोका असणारच की! नायडूतील '४० सुरक्षारक्षकां'ची टीम करतेय रजा न घेता काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 07:00 IST2020-04-19T07:00:00+5:302020-04-19T07:00:05+5:30

आमची नोकरीच सुरक्षारक्षकांची आहे, त्यामुळे चोरांशी काय किंवा आता कोरोनाशी काय सामना ठरलेलाच..!

The job would be such a risk! 40 security guards working without leave in the Naidu hospital | नोकरीच अशी तर धोका असणारच की! नायडूतील '४० सुरक्षारक्षकां'ची टीम करतेय रजा न घेता काम

नोकरीच अशी तर धोका असणारच की! नायडूतील '४० सुरक्षारक्षकां'ची टीम करतेय रजा न घेता काम

ठळक मुद्दे४० सुरक्षारक्षक तिथे कार्यरत आहेत. त्यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश अगदी सुरूवातीला हेच कर्मचारी बाधित रूग्ण, संशयित रूग्ण यांच्या येतात संपर्कात विशेष पोशाखासह मास्क वगैरे काळजी घेणारे सर्व साहित्य

राजू इनामदार- 
पुणे: आमची नोकरीच सुरक्षारक्षकांची आहे, त्यामुळे चोरांशी काय किंवा आता कोरोनाशी काय सामना ठरलेलाच! मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू झालेल्या डॉ. नायडू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही भावना आहे. सुटी किंवा रजा न घेता हे सुरक्षारक्षक धोका पत्करून कार्यरत आहेत.
महापालिकेच्या झोन १ मध्ये नायडू दवाखाना येतो. ४० सुरक्षारक्षक तिथे कार्यरत आहेत. त्यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूने शहरात कहर  केला असून त्यामुळे दवाखान्यातील वर्दळ वाढली आहे, त्याचबरोबर या सुरक्षा रक्षकांचे काम व त्यातला धोकाही!
दवाखान्याला ६ प्रवेशद्वारे आहेत. कोरोना बाधीत रूग्ण घेऊन रूग्णवाहिका आली की ती थेट वर असलेल्या प्रवेशद्वाराजवळ जाते. आलेल्या लोकांची विचारणा करणे, त्यांची नोंद करणे व मग त्यांना पुढे सोडण्याचे काम सुरक्षारक्षक करतात. त्याशिवाय डॉक्टरसहित अन्य लोकांची रूग्णालयातील ये-जा पण त्यांना पहायला लागते. कोणी पळून तर जात नाही ना, किंवा रूग्णाचे अन्य काही बेकायदेशीर ऊद्योग तर सुरू नाहीत ना याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते.
अगदी सुरूवातीला हेच कर्मचारी बाधित रूग्ण, संशयित रूग्ण यांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच त्यांना विशेष पोशाखासह मास्क वगैरे काळजी घेणारे सर्व साहित्य देण्यात आले आहे अशी माहिती झोन १ चे जमादार शिरीष सोनार यांनी दिली. मनोज शिंदे, विशाल पाटील, दत्तू गोरे, स्वप्नील लोखंडे, आकाश लोखंडे, माधव चौधरी असे अनेकजण न डगमगता इथे काम करत आहेत असे सोनार म्हणाले. मध्यंतरी रूग्णालयातून पळून जाणाऱ्या दोन रूग्णांना ध्रुव खुरे या कर्मचाऱ्याने पकडले असल्याची माहितीही त्यांनी दिली.


खराडी जलतरण तलावाजवळही पालिकेच्या आरोग्य विभागाने विलगीकरण कक्ष केला आहे. तिथेही १५ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. डॉक्टर  त्यांना असरलेला धोका स्विकारून काम करतात तर मग आम्ही का नाही करू शकत असे मनोज शिंदे यांचे म्हणणे आहे. सुरक्षा रक्षक म्हणून चोरांबरोबर तर नेहमीच सामना होतो, हा कोरोना विषाणू बरोबरचा असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही असे शिंदे म्हणाले.

.


 

Web Title: The job would be such a risk! 40 security guards working without leave in the Naidu hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.