शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

नोकरीच्या आमिषाने युवकांना गंडा, दौैंड येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:58 AM

दौैंड परिसरातील युवकांना रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून काही युवकांची ८० लाखांची फसणूक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.

दौैंड : दौैंड परिसरातील युवकांना रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून काही युवकांची ८० लाखांची फसणूक केली असल्याची माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली.या संदर्भात इंदिरा जाधव (वय ४८, रा. भिगवण रोड, बारामती) यांनी दौैंड पोलिसांत फिर्याद दिली असून रेल्वे कामगार नागनाथ कांबळे (रा. सहयोग सोसायटी, शेतकरी फार्मजवळ, दौैंड) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नागनाथ कांबळे आणि माझे पती हरिदास जाधव यांची ओळख झाली.यावेळी नागनाथ कांबळे म्हणाला, की मी रेल्वेत सर्व्हिसला असून माझ्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत ओळखी आहेत. त्यानुसार मी युवकांना २०१० पासून रेल्वेत कामाला लावत आहे. त्यानुसार माझ्या दोन्ही मुलाला नोकरीस लावतो, म्हणून त्याने आमिष दाखवले. त्यानुसार माझा मुलगा विजय जाधव याला तिकीट तपासणीस तर दुसरा मुलगा कुलदीप जाधव यास लोकोपायल म्हणून कामाला लावत आहे. त्यासाठी सुरुवातीला १० लाख रुपये दिले. १५ दिवसानंतर ६ लाख रुपये दिले. लवकरच तुमच्या मुलांना नियुक्तीचे पत्र मिळेल, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ६ लाखांची मागणी केली. आम्ही सोन्याचे दागिने मोडून आणि नातेवाईकांकडून असे ६ लाख रुपये जमा केले. त्यानंतर कामाला आज लावतो. उद्या लावतो असे सांगून वेळ मारून नेत असे. १ जून २०१७ रोजी माझे पती हरिदास जाधव यांचे निधन झाले. आमच्यावर दुखाचे सावट होते. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही कांबळे यांना भेटलो तेव्हा नोकरीविषयी विचारले असता ते म्हणाले तुमचे नोकरीचे काम होणार नाही. तुमचे पैैसे देणार नाही. असे सांगून दमदाटी केली. एकंदरीतच माझ्या नातेवाईकांसह दौैंडमधील अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. हिरा साळुंके (८ लाख), चंद्रकांत पवार (८ लाख), देविदास जाधव (१६ लाख), नीलेश आघाडे (८ लाख), नयना गुरव (८ लाख), शालू देडे (१६ लाख) अशी ८० लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा