बैल अचानक उधळला अन् जेजुरी गडावर एकच गोंधळ! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

By किरण शिंदे | Updated: February 8, 2026 14:56 IST2026-02-08T14:56:27+5:302026-02-08T14:56:58+5:30

अचानक बैल उधळल्याने भाविकांची पळापळ झाली. या गोंधळात तीन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

jejuri khandoba video Bull racing broke out at Jejuri fort, devotees fled; The entire incident was captured on CCTV | बैल अचानक उधळला अन् जेजुरी गडावर एकच गोंधळ! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

बैल अचानक उधळला अन् जेजुरी गडावर एकच गोंधळ! नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थान असलेल्या जेजुरी गडावर रविवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शर्यतीची बैलं पूजेसाठी गडावर आणण्यात आली असताना त्यापैकी एक बैल अचानक उधळल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  या गोंधळात तीन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काही शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीचे शौकीन यांनी आपल्या बैलांना खंडोबा देवाचे दर्शन घडवण्यासाठी जेजुरी गडावर आणले होते. दर्शनासाठी पायऱ्यांवरून बैलांना नेत असताना अचानक एक बैल घाबरून उधळला. त्यामुळे गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये एकच पळापळ उडाली. 

या गोंधळात काही भाविक पायऱ्यांवरून घसरून पडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही; मात्र काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. उपस्थित नागरिक आणि देवस्थान परिसरातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामध्ये बैल उधळल्यानंतर भाविकांची झालेली धावपळ स्पष्टपणे दिसत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु नंतर परिस्थिती सुरळीत झाली..

Web Title : जेजुरी मंदिर में बैल भगदड़, भक्तों में दहशत!

Web Summary : पुणे के जेजुरी मंदिर में एक बैल के भगदड़ मचाने से भक्तों में दहशत फैल गई। भागदड़ में कुछ लोगों को मामूली चोटें आईं। सीसीटीवी में कैद हुई घटना, कर्मचारियों द्वारा व्यवस्था बहाल।

Web Title : Bull stampede at Jejuri temple causes chaos; devotees panic.

Web Summary : A bull ran amok at Jejuri temple, Pune, causing panic among devotees. Some sustained minor injuries as people fled. The incident was captured on CCTV, and order was quickly restored by staff.