आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 02:23 PM2021-10-07T14:23:15+5:302021-10-07T14:26:28+5:30

इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले.

jaynat patil on bjp lakhimpur voilence kheri ajit pawar pune | आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

Next
ठळक मुद्देलखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केलालखीमपूरचं हत्याकांड जालियनवाला बाग सारखेच असल्याचे मंत्री पाटील म्हणाले

पुणे: आज पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती झाली. 'मंदिर उघडण्यात आले आहेत, हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये, महाराष्ट्र सुरक्षित रहावा हीच गणपती चरणी प्रार्थना केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हाणाले, राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करतंय करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स येते. भाजपनं राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतलाय..?, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, यांनाही न्याय मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

'आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत, त्यांना बदनाम केलं जातंय. धाडसत्र चालवण्याचा या व्यवस्थेचा हेतू आहे. 
या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कधीच कशाचीच कागदपत्रे दडवली नाहीत, ही माहितीही जयंत पाटील यांनी दिली. तसेच लखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. सध्या देशातील शेतकरी पेटून उठला आहे. लखीमपूरचं हत्याकांड जालियनवाला बाग सारखेच असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. 

Web Title: jaynat patil on bjp lakhimpur voilence kheri ajit pawar pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.