'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 07:53 AM2023-12-28T07:53:41+5:302023-12-28T07:57:52+5:30

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Jayant Patil's criticism of BJP over the invitation to inaugurate the Ram temple | 'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका

Jayant Patil ( Marathi News ) : पुणे- अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजुनही या उद्घाटनाचे निमंत्रण आले नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी राम मंदिर उद्घाटन निमंत्रणावरुन भाजपवर जोरदार टीका केली. 

"बाबरी मशिदीच्यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. ते खूप धाडसी होते, याची जबाबदारी भाजपमधील कुणीही घेतली नव्हती. आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला निमंत्रित करायला हवे होते, राम मंदिर ही कुणाची एका पक्षाची प्रॉपर्टी नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 

'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही'

जयंत पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात अनेक खासदार गेल्या दोन-तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्नांची मांडणी करतात, परंतु सर्वात जास्त प्रभावी मांडणी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आहे,  आज काही लोक अमोल कोल्हे यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच तुम्ही आव्हान दिलं पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख अमोल कोल्हेंनी जनतेला करून दिली. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.  

Web Title: Jayant Patil's criticism of BJP over the invitation to inaugurate the Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.