शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

दौंड रेल्वे ट्रॅकचा प्रश्न सुटणार- जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 2:17 AM

रेल्वेने दौंडमार्गे प्रवास करताना दौंड जंक्शनवर रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. प्रवाशांचे सुमारे ३५ ते ४० मिनिटे वाया जातात.

पुणे : रेल्वेने दौंडमार्गे प्रवास करताना दौंड जंक्शनवर रेल्वे इंजिनची दिशा बदलावी लागते. प्रवाशांचे सुमारे ३५ ते ४० मिनिटे वाया जातात. रेल्वे स्थानकाची लांबी वाढविण्यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पुढील आठ दिवसांत पूर्ण केले जाईल. या पुढील काळात इंजिन बदलण्याची वेळ येणार नाही. परिणामी प्रवाशांचा विनाकारण वाया जाणारा वेळ वाचणार आहे, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी सांगितले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीनंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, अनिल शिरोळे, आमदार बाबूराव पाचर्णे, माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.जावडेकर म्हणाले, पुणे रेल्वे स्टेशन येथे पाच एस्केलेटर बांधण्यात येणार आहेत. येत्या ३ ते ४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. लघु उद्योजकांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मुद्रा योजनेतून पुणे जिल्ह्यातील ६ लाख ६० हजार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी ६ हजार कोंटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. वार्षिक बारा रुपये भरून विमा उतरवणाऱ्या नागरिकांची संख्या बारा लाख एवढी आहे.पोस्ट आॅफिसमध्ये बँकेत मिळणाºया सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. देशातील काही शहरांतील पोस्टात या सुविधा सुरू असून, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८९१ पोस्ट कार्यालयांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिणामी बँक नसणाºया गावांमध्ये पोस्टल बँक सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPrakash Javadekarप्रकाश जावडेकर