शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

जय हरी विठ्ठल! आषाढी वारी सोहळ्याची मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 11:01 PM

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.  कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत निवडक संबंधित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे माऊलींची आषाढी वारी निवडक चाळीस वारकऱ्यांसह माऊलींच्या चलपादुका घेऊन बसद्वारे पंढरीला गेली होती. चालू वर्षी माऊलींचा सोहळा ३२ दिवसांऐवजी पौर्णिमेनंतर काल्याचा कार्यक्रम करून पंढरीहून स्वगृही परतला होता. त्यानंतर आळंदीत दाखल झालेल्या माऊलींच्या चलपादुकांना कारंज्या मंडपात विराजमान करून त्या ठिकाणी पादुकांना दैनंदिन नित्योपचार करण्यात आले आहेत.तत्पूर्वी मंगळवारी (दि.०३) विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पादुकांना पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा संपन्न झाली. सायंकाळी वीणामंडपात चक्रांकित महाराजांच्या वतीने नियमित सुरू असलेली ह.भ.प. जगदीशशास्त्री जोशी यांची कीर्तन सेवा पार पडली. प्रथेप्रमाणे चोपदारांनी देव आल्याची वर्दी दिल्यानंतर चक्रांकित महाराजांची दिंडी देवाला सामोरे गेली. टाळ - मृदुंगाच्या निनादात तसेच 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून वीणामंडपमार्गे कारंज्या मंडपातून माऊलींच्या चलपादुका गाभाऱ्यात नेण्यात आल्या.  "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय" असा जयजयकार करत पादुकांना माऊलींच्या संजीवन समाधीसमोर विराजमान करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार माऊलींना पिठलं - भाकरीचा महानैवेद्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे श्री. चक्रांकित महाराज यांनी अर्पण केला. विधिवत आरती घेऊन आषाढी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, ह.भ.प. चक्रांकित महाराज, चैतन्य महाराज कबीरबुवा, योगीराज कुऱ्हाडे, माऊली गुळुंजकर,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य निवडक वारकरी उपस्थित होते. 

बुधवारी (दि.०४) कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या संजीवन समाधीला पहाटे पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंढरीच्या आषाढी एकादशीनंतर असलेल्या कामिका एकादशीनिमित्त हजारो वारकरी अलंकापुरीत माऊलींच्या दर्शनाला येतात. मात्र सध्या शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भाविकांनी दर्शनाला येऊ नये असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर