पुणे : समोर अजित पवारांसारखा तगडा राजकारणी पालकमंत्री म्हणून आलेला असताना आमदार असूनही पाच वर्षात विधानसभेत कसलीही धडाकेबाज कामगिरी न करणारे माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्ष म्हणून का केली असावी, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यांच्याबरोबरच या पदासाठीच्या स्पर्धेत असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांसाठीही पक्षश्रेष्ठींनी केलेली ही निवड अनपेक्षित व अनाकलनीय ठरली आहे.विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमवाव्या लागल्यानंतरही पक्षश्रेष्ठींना पुण्यातील संघटना अशी पणाला का लावावी वाटली, असा प्रश्न कार्यकर्ते आपापसात विचारताना दिसत आहेत. जगदीश मुळीक हे सन २०१४मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार झाले. शांत, विचारी व कोणताही निर्णय घेण्याआधी किमान पन्नास वेळा विचार करणारे, अशी त्यांची ख्याती आहे. पक्षाच्या पुण्यातील अन्य काही आमदारांना चिकटले तसे कोणतेही किटाळ त्यांना पाच वर्षांत चिकटले नाही. पक्षाच्या कोणत्याही गटबाजीत ते नसतात. कोणत्याच नेत्याचा त्यांच्या नावावर शिक्का नाही; मात्र तरीही ते राजकारणात प्रवीण असल्याचे त्यांनी या निवडीतून दाखवून दिले आहे.
अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:31 IST
उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अशी दोन पदे मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आक्रमक.
अजित पवारांसमोर मुळीक पुरे पडणार का ?
ठळक मुद्देअन्य नावेही शहराध्यक्षपदाच्या होती स्पर्धेत शांत, विचारी व निर्णयाआधी किमान पन्नास वेळा विचार करणारे, अशी मुळीकांची ख्याती जगदीश मुळीक हे सन २०१४मध्ये वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकांतील पराभव पवारांच्या जिव्हारी