शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगीताची वर्गवारी करणे उचित नाही : डॉ. श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:02 IST

विठ्ठलाच्या भक्तीसाठीच संतानी ही संगीत परंपरा निर्माण केली...

पुणे : वारकरी संगीत परंपरा ही अभिजात संगीत परंपरा असून, प्रत्येक परंपरेला स्वत:चे म्हणून शास्त्र असते.  शास्त्रीय संगीत. उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत अशी वर्गवारी करणे उचित ठरत नाही असे मत चौदाव्या चौदाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  संगीतोन्मेष संस्थेने आयोजित केलेल्या  चौदाव्या अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलनाप्रसंगी ते बोलत होते.  संमेलनाचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने ‘ वीणा उभा ’ करून झाले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, कार्याध्यक्ष अनिल ससार, पं.यादवराज फड. संजय बालवडकर, सुनील पासलकर. राधाकृष्ण गरड हे मान्यवर उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले, वारकऱ्यांचे सत्ताकेंद्र एकच आहे, ते म्हणजे विठ्ठल.  विठ्ठलाच्या भक्तीसाठीच संतानी ही संगीत परंपरा निर्माण केली. म्हणून या परंपरेत विठ्ठलाचे उपचार दिसतात, देव जागा झाला म्हणून काकडारती, संध्या समयी धुपारती . झोपताना शेजारती, देवाला उषणतेचा त्रास होऊ नये म्हणून उटीचे भजन, जागर, वाटचालीचे भजन आदी प्रकार रूढ झाले. निरपेक्ष भक्तीने ओथंबलेली हि संगीत परंपरा आहे .म्हणूनच  800 वर्षांपासून वाढतच आहे आणि वाढतच रहाणार. अभंगाच्या अक्षरावर कुठेही अन्याय होणार नाही असेच पारंपरिक चालीचे नियोजन असते, या परंपरेने आधुनिक काळाचा कल लक्षात घ्यावा, म्हणजे परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावेल.                                                                   मुरलीधर मोहोळ म्हणाले संत  ज्ञानेश्वर संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पंचक्रोशीत पुणे शहरात हे संत परंपरेचे संगीत  संमेलन होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. यावेळी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, पं.यादवराज फड यांची ही भाषणे झाली. उद्घाटनानंतर  दत्तात्रय कांबळे यांचे अभंग गायन, कृष्णाई उळेकर ने भारूड तर प्रचला अमोणकर यांनी भक्ती संगीत सादर केले.  पूजा सबनीस यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरmusicसंगीत