शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नयनतारा सहगल यांना संमेलनात येऊ न देणे चुकीचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 2:01 AM

विनोद तावडे : डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार सोहळा

पुणे : साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडले पाहिजे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल या संमेलनाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी केलेल्या विधानांवरून काही वाद झाला असता तर मी समजू शकलो असतो. परंतु, त्यांना येऊ न देण्याची भूमिका घेणे अत्यंत चुकीचे आहे, अशा शब्दांत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मनसेला टोला लगावला.

मुक्तछंद संस्थेतर्फे ‘भेट साहित्य शारदेची’ कार्यक्रमात साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर तावडे पत्रकारांशी बोलत होते. आयोजकांनी कुणाच्या तरी दबावाला बळी पडून नयनतारा सहगल या इंग्रजी लेखिकेला संमेलनाला न येण्याचे पत्र पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर तावडे यांना विचारले असता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्याही वादविवादापासून दूर राहून झाले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र हा प्रत्येकाला आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी देणारा आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनात येऊन भूमिका मांडल्यानंतर त्याला विरोध झाला तर ते समजून घेऊ शकतो. मात्र, त्यांना येऊ न देणे योग्य नाही. साहित्य संमेलनात वाद होऊ नयेत, असे माझे स्पष्ट मत आहे.शिक्षण सोड अन् नोकरी कर...४अमरावती येथील एका कार्यक्रमात विद्यार्थ्याने शिक्षण घेणे परवडत नसल्याकडे शिक्षणमंत्री या नात्याने तावडे यांचे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर ‘शिक्षण सोड आणि नोकरी कर’ असा सल्ला त्यांनी दिला होता.४’शिक्षण घेणं परवडत नसेल, तर शिक्षण सोड आणि नोकरी कर, असे विधान मी केलेलेच नाही, असे सांगत पत्रकारांवरच गुगली टाकली. तशी एकही ‘क्लिप’ उपलब्ध नाही.४माध्यमांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी असे काही बोलल्याची क्लिप सादर करा, पोलिसांना विचारा. माहिती न घेता राजकीय कार्यकर्त्याला पिंजऱ्यात उभे करणे हा माध्यमांचा दुरुपयोग आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमधील प्राध्यापक आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद चिघळला आहे. त्यासंदर्भात विचारले असता, कोणत्याही परिस्थितीत सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत, असे सांगून तावडे यांनी वेळ मारून नेली. मात्र, नेमके काय करणार याचे उत्तर देणे टाळले. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेPuneपुणे