कचरा डेपोला आग लावणे महागात पडणार; महापालिका दोषींवर कठोर कारवाई करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:49 PM2020-11-02T17:49:59+5:302020-11-02T17:52:16+5:30

सीसीटीव्हीच्याआधारे आंदोलकांची ओळख पटविण्याचे काम सुरू

It would be very expensive to set fire to a garbage depot; Municipal Corporation will take strict action against the culprits | कचरा डेपोला आग लावणे महागात पडणार; महापालिका दोषींवर कठोर कारवाई करणार 

कचरा डेपोला आग लावणे महागात पडणार; महापालिका दोषींवर कठोर कारवाई करणार 

Next

पुणे : आंबेगाव पठार येथील कचरा प्रकल्प जाळण्यात आल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेचा आधार घेण्यात येणार असून हे फुटेज पोलिसांना देण्यात येणार आहे. पोलिसांकडून सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून आंदोलकांची ओळख परेड घेण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. 

आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामधून दुर्गंधी येत असल्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा होत असल्याचे कारण देत या भागातील नागरिकांनी रविवारी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान प्रकल्प पेटवून देण्यात आल्याची घटना घडली. या प्रकल्पाला नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी 'आंबेगावची फुरसुंगी होऊ दिली जाणार नाही' अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी आंदोलन झाले.

या प्रकाराची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. कुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  प्रकल्प पेटवून देण्यात आल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामागे नेमकी कोणती माणसं आहेत याची माहिती घेतली जात आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ओळख पटविली जाणार आहे. हे फुटेज पोलिसांना दिले जाणार असून पोलीस या अनुषंगाने तपास करतील यासोबतच प्रकल्पावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांनी आंदोलकांची ओळख परेड घेतली आहे. यामधून आंदोलक निष्पन्न करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, या आंदोलनात कोणीही नगरसेवक, लोकप्रतिनिधी अथवा नागरिक सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. कायदा सर्वांना समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: It would be very expensive to set fire to a garbage depot; Municipal Corporation will take strict action against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.