शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रशियामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे पार्थिव भारतात आणणे झाले शक्य; सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 21:18 IST

इंदापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे रशियात कर्करोगामुळे निधन झाले होते.....

ठळक मुद्देइंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुकमध्ये झाले अंत्यसंस्कार

बारामती : रशियामध्ये निधन झालेल्या इंदापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याचे पार्थिव भारतात आणणे खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे शक्य झाले. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने २१ एप्रिल रोजी कर्करोगामुळे निधन झाले.

तन्मय आबासाहेब बोडके (वय २२, रा. पिंपरी बुद्रुक, ता. इंदापूर) असे या विद्यार्थ्यचे नाव असून तो रशियामध्ये एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षाला होता. रशियामधील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो शिकत होता. अचानक वजन वाढत जाऊन त्याला चालणेही मुश्किल झाले. त्यामुळे रुग्णालयात तपासणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचे लक्षात आले. त्यासाठी शस्त्रक्रिया चालू असताना रक्तदाब कमी होऊन त्याचे निधन झाले, अशी माहिती तन्मय याचे निकटवर्तीय श्रीकांत बोडके यांनी दिली. 

भारतात सध्या कोरोनाच्या साथीने थैमान घातले असून महाराष्ट्रात तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत परदेशात निधन झालेल्या तन्मयचे पार्थिव विमानाने भारतात आणून त्याच्या मूळ गावापर्यंत पोहोचवणे मोठे जिकिरीचे होते. ही बाब श्रीकांत बोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार सुळे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर, रशियाचा भारतातील दूतावास, तेथील निझनी विद्यापीठ प्रशासन यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत तन्मय याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊन अखेर २९ एप्रिल रोजी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याचा मृतदेह आणण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत सुप्रिया सुळे या सातत्याने बोडके कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. त्यांना सतत आधार देत इकडे दोन्ही देशांच्या प्रशासनाशीही त्या पाठपुरावा करत होत्या. अखेर मृतदेह मुंबईत दाखल झाल्यानंतर सुळे यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर, रशियन दूतावास आणि अन्य शासकीय यंत्रणांचे आभार मानले.  तन्मयचे पार्थिव मुंबईहुन रुग्णवाहिकेतून इंदापूर तालुक्यात पिंपरी बुद्रुक या त्याच्या मूळ गावी आणल्यानंतर काल (दि. ३०) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत अडचणीच्या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या मदतीमुळे तन्मयचे पार्थिव आणता आले. त्यासाठी संपूर्ण बोडके कुटूंबीय आणि निकटवर्तीय सुळे यांचे आभारी आहोत, अशा भावना श्रीकांत बोडके यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :BaramatiबारामतीIndapurइंदापूरSupriya Suleसुप्रिया सुळेrussiaरशियाIndiaभारतcancerकर्करोगDeathमृत्यूStudentविद्यार्थी