बर्थ डे बॉयला रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 21:07 IST2021-03-13T21:06:11+5:302021-03-13T21:07:16+5:30
बॉयसोबत सहा जणांवर गुन्हा दाखल

बर्थ डे बॉयला रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पडले महागात
पिंपरी: वाढदिवसाला फटाक्यांची आतिषबाजी केली. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. याप्रकरणी ‘बर्थ डे बॉय’सह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी येथे शुक्रवारी ही कारवाई कारण्यात आली.
‘बर्थ डे बॉय’ अतुल गोकुळ शिंदे (वय २५), गौरव डफळ, संकेत डफळ, दादू गव्हाणे, अनिकेत गायकवाड, राहुल गाढवे (सर्व रा. भोसरी), असे गुन्हा दाखल करण्यात झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक रवींद्र दत्तात्रय जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त अन्य आरोपींनी तोंडास मास्क लावता एकत्र येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा केला. रस्त्यावर केक कापून फटक्यांची आतिषबाजी करीत सार्वजनिक शांततेचा भंग केला.