शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आयटी ‘वारकरी’ दत्तक घेणार ‘शाळकरी’

By admin | Updated: July 5, 2015 01:07 IST

माहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत.

पराग पोतदार, पुणेमाहिती-तंत्रज्ञानाच्या महाजालात असतानाही विठ्ठलाच्या ओढीने वारीत सहभागी होणारे आयटीतले ‘वारकरी’ आता सामाजिक बांधिलकीचा वसाही घेऊ पाहत आहेत. यंदा वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याबरोबरच हे सर्व जण मिळून आश्रमशाळांतील १५ हून अधिक शाळकरी मुलांना दत्तक घेणार आहेत. सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख असणारी पुण्यनगरी ही गेल्या दशकामध्ये आयटीनगरी बनलेली आहे. पुण्यामध्ये २०० हून अधिक आयटी कंपन्या असून हजारो तरुण मुले या आयटी कंपन्यांतून काम करीत आहेत. या साऱ्यांना आळंदीहून पंढरपुराकडे जाणाऱ्या वारीची ओढ निर्माण झाली आणि त्यांनी त्यात सहभागी होण्यासाठी ‘आयटी दिंडी’ स्थापन केली असून त्यात सहभागी होणाऱ्या आयटी मित्रांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर आयटीतील प्रमुख आयोजकांनी त्याला सामाजिक बांधिलकीचेही स्वरूप द्यायचे ठरवले आहे. दरवर्षी काही ना काही विधायक उपक्रमांतून वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांना मदत दिली जाते. परंतु त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात रक्कम शिल्लक राहत असे. हे आयटी मित्रांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी या वर्षापासून आश्रमशाळांच्या १५ मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याद्वारे या सर्व गरीब, गरजू परंतु होतकरू व हुशार मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हे आयटीतले वारकरी उचलणार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी फासेपारध्यांच्या मुलांना गरजेच्या वस्तू भेट दिल्या होत्या.लाखो वारकरी जो आनंद घेत वारीमध्ये सहभागी होतात त्यात आपणही सहभागी व्हावे, या भावनेतून आयटी दिंडी दरवर्षी आळंदीहून निघते. दरवर्षी एक सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयास असतो. यापूर्वी वृक्षसंवर्धन व मुलगी वाचवा हा संदेश दिलेला होता. या वर्षी स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा आग्रह-विठोबाचा निग्रह असा संदेश असणाऱ्या टोप्या वारकऱ्यांना ते भेट देणार आहेत व स्वच्छतेचा जागर मांडणार आहेत. वारकऱ्यांमधील अनेक जण आपल्या मुलांना आयटीत नोकरी मिळावी, म्हणून आयटी दिंडीतील लोकांकडे त्यांचे बायोडाटा आणून देतात. त्यामुळे इंग्रजी संभाषणापासून ते नोकरी मिळवून देण्यापर्यंत हे सारे त्यांना मदत करतात. त्याशिवाय वारी या आपल्या सांस्कृतिक व आध्यात्मिक संचिताचे आॅनलाइन डॉक्युमेंटेशन व वारीतील वारकऱ्यांचा डाटाबेस करण्याची कल्पना मनात आहे, असे आयटी दिंडीचे प्रमुख समन्वयक प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.