शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

SSC Result: पुण्यातील पठ्ठ्याची कमाल! सर्व विषयात ३५ गुण; पोलीस बनून देशसेवा करायचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:45 IST

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यावर राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण

पुणे : आजच दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील अनेक शाळांबाहेर जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. पालक, विद्यार्थी तसेच शिक्षक एकमेकांचे अभिनंदनही करताना दिसत आहेत. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. कोकण विभागाने यंदा दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. अनके जिल्ह्यात तर मुली या मुलांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरल्या आहेत. पुणे जिल्ह्याचा निकालही ९६.७४ टक्के लागला आहे. मुलामुलींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. काही विद्यार्थ्यांना ८०, ९० टक्के मिळाले आहेत. तर काही जण उत्तम मार्कानी पास झाले आहेत. त्यातच पुण्यातील एका पट्ठ्याने सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. शुभम जाधव असे या होतकरू विद्यार्थ्याचे नाव आहे. त्या अनुषंगाने लोकमतने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागतं. पण पोलीस बनून पुढे देशसेवा करण्याचे माझे स्वप्न असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली आहे. 

शुभम हा एका होतकरू कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग या शाळेत शिकत आहे. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. शुभम दिवसभर हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्यानंतर सायंकाळी घरी येऊन तो दहावीचा अभ्यास करत असे. 

दहावीत ३५ टक्के गुण मिळवल्याबाबत शुभमला काय वाटते असे विचारल्यावर तो म्हणाला, मला आनंद झाला पण एवढा नाही. मला ६० - ५० टक्कयांची  अपेक्षा होती. पण तेवढे मिळले नाहीत. मी पास झाल्याने समाधानी आहे. माझे मित्र ५० टक्कयांच्या वर आहेत. पण मी त्यांच्यापेशा खाली असल्याचे थोडे दुःख वाटते. पण दहावीत ३५ टक्के मिळवायला लक लागते. असे तो म्हणाला आहे. 

''पुढे मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार आहे. मला भविष्यात पोलीस होयच आहे. मला देशासाठी चांगलं काहीतरी करण्याची इच्छा असल्याने मी पोलीस होण्याचा विचार केला आहे असेही त्याने यावेळी सांगितले आहे.''  

आम्ही शुभमच्या पाठीशी आहोत 

शुभम हा एक होतकरू मुलगा आहे. तो अत्यंत खडतर परिस्थितीत पास झालाय. तो नेहमी सकारात्मक विचार करत असतो. म्हणून त्याला मार्कांचे काही वाटत नाही. त्याला दहावीला ३५ गुण मिळाले आहेत. १२ वीला तो अजून अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवेल. इथून पुढील त्याच्या सुखदुःखात आम्ही मदत करत राहू. अशी प्रतिक्रिया त्याच्या घराजवळील लोकांनी दिली आहे.   

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीssc examदहावीTeacherशिक्षकSchoolशाळा