खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 10:19 IST2024-04-09T10:18:59+5:302024-04-09T10:19:19+5:30

महाविकास आघाडी लवकरच एकमताने सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर करेल, आमचेही सर्व उमेदवार निश्चित होत आहेत, असे त्यांनी सांगितले....

It is sad that Khadse has gone there, soon all the leading candidates will be announced - Jayant Patil | खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

खडसे तिकडे गेल्याचे वाईट वाटतेच, लवकरच आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर होतील- जयंत पाटील

पुणे :एकनाथ खडसे परत तिकडे गेले याचे वाईट वाटणारच, त्यांच्या संकटकाळात आम्ही त्यांना बरोबर घेतले. आता त्यांना पाॅलिटिकल कंपलशन आहे की नाही? याबद्दल सांगता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी लवकरच एकमताने सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर करेल, आमचेही सर्व उमेदवार निश्चित होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत पक्षाच्या बैठकीसाठी म्हणून जयंत पाटील सोमवारी (दि. ८) दुपारी पुण्यात पवार यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी आले होते. पत्रकारांबरोबर बोलताना पाटील म्हणाले की, जळगाव, माढा, सातारा येथील आमच्या जागांवरचे उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा सुरू आहे. आमच्या सर्व जागा निवडून याव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे. आमच्या आघाडीत काय चर्चा होतात, कोणाला काय शब्द दिला जातो हे जाहीरपणे सांगणे योग्य नसते. त्या त्या वेळचे ते बोलणे असते.

Web Title: It is sad that Khadse has gone there, soon all the leading candidates will be announced - Jayant Patil