शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दर्शना पवारचा खून झाल्याचे उघड; राहुल हांडोरेच्या शोधासाठी पोलीस सिन्नरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 21:20 IST

राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे

वेल्हे : एमपीएससी परीक्षा देऊन अधिकारी झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत राजगडाच्या पायथ्याशी आढळला होता. यामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले असून, वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून दर्शनाचा मित्र राहुल हांडोरे याच्या शोधासाठी पोलिसाचे एक पथक त्याच्या गावी शहा (ता. सिन्नर) येथे गेले पण तेथेही तो मिळून आला नाही. अन्य काही ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शना आणि तिचा मित्र राहुल हंडोरे (रा.नाशिक) हे १२ जूनला ट्रेकिंगसाठी राजगडावर आले होते. दरम्यान, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे दर्शनाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला, तर तिचा मित्र राहुल हंडोरेचा अद्यापही मिळून आलेला नाही. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाला पोलिसांना नुकताच मिळाला आहे. त्यामध्ये दर्शनाच्या शरीरावर आणि डोक्याला मारहाणीच्या जखमा असून, त्यामध्ये तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

राजगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दर्शनासोबत दिसणारी शेवटची व्यक्ती ही राहुल हांडोरे हा युवक पोलिसांच्या रडारवर आला आहे. राहुल हा सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील रहिवासी असून तो देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र दर्शनाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याच्या क्षणापासून तो बेपत्ता असल्याने पोलिसांचा मुख्य संशय त्याच्यावर आहे.

राहुलचा हांडोरेचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहे. ग्रामीण पोलिसांचे एक पथक सोमवारी राहुलच्या सिन्नर तालुक्यातल्या शहा या गावी गेले होते. पण तो तेथे मिळून आला नसला तरी त्याच्याबाबत महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसFortगडCrime Newsगुन्हेगारीMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीDarshana Pawarदर्शना पवार हत्या