शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब होण्यासाठी अशी शाळा करणे बरोबर नाही;पदोन्नती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जोडली बोगस प्रमाणपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:40 IST

राज्यात एवढ्या शिक्षण संस्था अधिकारी शिकण्यासाठी परराज्यांत का गेले? असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा फिव्हर कमी झाला आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बोगस प्रमाणपत्र आणि त्याचा आधार घेऊन घेतलेली पदोन्नती. खरं म्हणजे राज्यात एवढ्या शिक्षण संस्था अधिकारी शिकण्यासाठी परराज्यांत का गेले? असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. साहेब होण्यासाठी अशी ‘शाळा’ करणे बरोबर नाही, असा टोलाही लगावला जात आहे.परराज्यांतील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळविल्या आहेत. दूरस्थ शिक्षणाद्वारे नियमबाह्य पद्धतीने बोगस अभियंता पदविका प्रमाणपत्र सादर करून काही जण महापालिकेत पदोन्नतीने अभियंता पदावर कार्यरत आहेत. तर आणखी काही जण याच पद्धतीने बोगस प्रमाणपत्र देऊन पुन्हा महापालिका प्रशासनाची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बोगस पदव्या घेऊन महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी पदोन्नती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केलेली नाही.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार वर्ग तीन व चारमधील पात्र कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंतापदावर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. या नियमाच्या आधारे गेल्या दहा वर्षांत महापालिकेत रखवालदार, मजूर, गवंडी, बिगारी, शिपाई, क्लार्क, आरोग्य निरीक्षक, सर्व्हेअर अशा कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, ही पदोन्नती मिळविताना अनेक कर्मचाऱ्यांनी परराज्यांतील म्हणजेच राजस्थान, केरळ, कर्नाटक, आसाम, सिक्कीम या राज्यांतील विद्यापीठांच्या पदव्या घेतल्या आहेत.राज्याबाहेरील पदव्यांना महापालिकेत पदोन्नतीसाठी बंदीराज्याबाहेरील विद्यापीठामार्फत दूरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धारण केलेली पदवी/पदविका विधी ग्राह्य आहे की नाही? याबाबत शासनाच्या विविध प्राधिकरणामार्फत आलेले आदेश आणि सूचना यांचा एकत्रित अभ्यासानुसार राज्याबाहेरील मान्यता नसलेल्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थेची पदवी किंवा पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असे लेखी आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने याबाबत आता स्पष्ट भूमिका घेऊन परराज्यातील पदव्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांना राज्याबाहेरील विद्यापीठाकडून दूरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धारण केलेल्या पदवी, पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असा स्पष्ट आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासनाकडून राज्याबाहेरील कर्मचाऱ्यांच्या पदवी, पदविका ग्राह्य धरून आदेश काढल्यानंतर एकाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिलेली नाही. मात्र, पूर्वी दिलेल्या पदोन्नतीबाबत मला काहीच माहिती नाही.-विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस