फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:13 PM2024-03-14T12:13:04+5:302024-03-14T12:14:08+5:30

बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते....

It is not in my blood to seek selfishness just by keeping an eye on the elections - Deputy Chief Minister Ajit Pawar | फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही- अजित पवार

बारामती (पुणे) : देशात राज्यात काहीही घडो, मात्र १९९१ पासून मला बारामतीत मुस्लीम समाजाने कायम पाठिंबा दिला. फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून स्वार्थ साधणे माझ्या रक्तात नाही, कोणतेही काम मनापासून करण्याचा माझा प्रयत्न असतो. कोणताही प्रसंग आला महायुतीत असलो तरी शाहु, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती येथे माैलाना आझाद मंडळाच्या वतीने १५० व्यावसायिकांना साडेचार कोटी कर्जमंजुरी पत्राचे वाटप उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून आचारसंहिता  सुरू होईल. आचारसंहिता जवळपास जाहीर झाल्यात जमा आहे. अनेकांनी त्यांच्या कामाबाबत पत्र दिली आहेत. मात्र, आचारसंहिता संपल्यावर नागरिकांच्या मागण्या मार्गी लावण्याच्या सुचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. घेतलेल्या कर्जाचा वापर त्याच कारणासाठी करा. कर्जाची वेळेत परतफेड केल्यास वेगवेगळ्या भागात अल्पसंख्यांक समाजाला निधी देणे शक्य होइल. कर्जवाटप करताना व्यवसायिकांना प्राधान्य देण्याची सुचना पवार यांनी केली.

आज सरकारच्या वतीने मी आलो आहे. यापुर्वी काही लोकांनी तुमची मते मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्या पद्धतीने समाजाला ते दिले नाही. लवकरच लोकसभा निवडणुका लागतील, आजपर्यंत तुम्ही माझे एकत आलेला आहात. घड्याळाची साथ सोडलेली नाही. यंदाही तुमची साथ राहु द्या, तुमचे पवित्र मत द्या असे भावनिक आवाहन पवार यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक मुस्लीम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी रमजान इद सणापुर्वी कर्जमंजुरी प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत संबंधितांना सुचना देण्याची मागणी केली. यावेळी बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी हाेळकर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, कमरुद्दीन सय्यद आदी उपस्थित होते.

....मी वाढायचे काम करतो

आचारसंहिता सुरु होणार असल्याचे शासकीय कामे, त्यासंबंधी मंजुरी देणे शक्य होणार नाही. नागरिकांनी मागणी केलेली कामे, नवीन कामांचे प्रस्ताव, आराखडे आदी कामांचे नियोजन करुन ठेवा. आचारसंहिता सुरु असल्याने ती कामे नंतर होतील. तुम्ही शिजवायचं काम करा, मी वाढायचे काम करतो अशी मिश्कील टीपणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वीय सहायक हनुमंत पाटील यांना केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुरुवारी बारामती मॅरेथाॅन दाैरा आहे. मात्र, बारामती शहरातील पहिल्याच सभेत उपमुख्यमंत्री पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे टाळले.

...सुनेत्रा पवार भावी खासदार

कार्यक्रमाचे संयोजक मुस्लीम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित मनोगत व्यक्त केले. यावेळी सय्यद यांनी सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार असा उल्लेख भाषणात केला. त्यामुळे सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या उमेदवार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Web Title: It is not in my blood to seek selfishness just by keeping an eye on the elections - Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.