शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 23:00 IST

अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

देशात आणि राज्यात अनेक खासदार गेल्या दोन-तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्नांची मांडणी करतात, परंतु सर्वात जास्त प्रभावी मांडणी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. पुण्याच्या खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात जयंत पाटील बोलत होते. 

इथे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी उपस्थित आहेत तुम्ही फक्त युट्युबवर अमोल कोल्हे टाका आणि त्यांचे संसदेतले भाषण ऐका ते कोणत्या विषयावर बोलले नाही असं कधीच झाले नाही त्यांनी जे काही प्रश्न मांडले ते नेहमी प्रभावीपणेच मांडले, असं  जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली. 

आज काही लोक अमोल कोल्हे यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच तुम्ही आव्हान दिलं पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख अमोल कोल्हेंनी जनतेला करून दिली. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. 

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे. 

दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले?

दादांनी माझी नेहमीच पाठराखण केली आहे. आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं माझ्यासाठी उचित ठरणार नाही. काही चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार आहे. पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला, बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला, संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, तेव्हा जर काही चुकलं असत तर त्यांनी कान धरले असते. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठक घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच. चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. ते आता का बोलले हा प्रश्न मला पडतोय.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार