शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का?" राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 13:29 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला

ठळक मुद्देमराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली करण्यातच पुढे आहेत.

पुणे: मराठा आरक्षणाच्या मोर्चाला  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व नेते या मोर्चाला गेले होते. मराठा आरक्षण सर्वांना मान्य आहे, मग नेमकं अडलंय कुठं. मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? असा सवाल उपस्थित करत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला आहे.  

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही सर्वांना मान्य आहे. ते रद्द केलं गेलंय. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारांना मान्य आहेत, तर अडतंय कुठं. कोर्टामध्ये तुमची बाजू प्रभावीपणे मांडली का जात नाहीये? सर्वांना एकदा व्यासपीठावर आणा, त्यांना विचारा तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी 'एकला चलो'चा नारा दिला होता. तसेच पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, सध्या कोण एकमेकांचे शत्रू किंवा मित्र झाले आहेत हेच कळत नाहीये. नेते आज काय बोलतील आणि उद्या काय बोलतील हे सांगता येत नाही.  

मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली

मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकला-ढकली करत आहे. हे लोकांनी पाहणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांना या प्रश्नांनी उत्तरं विचारली गेली पाहिजे. तुम्हा सर्वांचे या मुद्द्यावर एकमत आहे, तर मग नेमकं घोडं पेंड कुठं खातंय. नेते केवळ मतदानासाठी लोकांकडे जातात आणि निवडणूक झालं की तोंड फिरवलं जातं, असा करुन चालणार नाही. लोकांनी राजकीय नेत्यांना जाब विचारायला हवा. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.  

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणGovernmentसरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस