शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मेट्रोचे जाळे शहरात विणल्याशिवाय सार्वजनिक वाहतुकीचा ताण कमी होणे अशक्य : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 4:46 PM

नागरिकांनी मागणी केलेल्या स्वारगेट कात्रज, रामवाडीच्या पुढे निगडी तसेच अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरूवात झाली आहे.

पुणे: शहरातील वाहतूकीची समस्या गंभीर झाली आहे. ती सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. मेट्रोचे, वातानुकुलित इ-बस, एचसीएमटीआर रस्ता हा सर्व त्या प्रयत्नांचाच भाग आहे.  इ-बस नुकत्याच सुरू झाल्या,अल्पावधीतच ३० टक्के काम पुर्ण करण्यापर्यंत मजल गाठलेली पुणेमेट्रो लवकरच रुळांवरून धावू लागेल. तसेच संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे विणल्याशिवाय वाहतुकीचा ताण कमी होणार नाही असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला. मेट्रो च्या भूयारी मागार्साठी लागणाऱ्या शाफ्टच्या कामाचे भूमिपजून बापट यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी कृषी महाविद्यालच्या मैदानावर झाले. स्थानिक आमदार विजय काळे, स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे, सोनाली लांडगे, राजश्री काळे तसेच मेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक रामनाथ सुब्रम्हण्यम, नगरसेवक महेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते. या जागेवरून भूयारी मार्ग सुरू होणार आहे. भूयार खोदण्यासाठी लागणारे यंत्र आत जावे यासाठी एक शाफ्ट तयार करावा लागतो. त्या कामाला आज सुरूवात करण्यात आली. बापट म्हणाले, भाजपाने सत्तेवर येण्यापुर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. मेट्रोच्या कामाला सुरुवातीस विलंब झाला, मात्र गतीने काम करून तो भरून काढण्यात आला. इतक्या कमी कालावधीत २८ ते ३० टक्के काम पुर्ण होणे उल्लेखनीय आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे विहित मुदतीच्या आधीच म्हणजे सन २०२० मध्येच मेट्रो धावू लागेल. नागरिकांनी मागणी केलेल्या स्वारगेट कात्रज, रामवाडीच्या पुढे निगडी तसेच अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरूवात झाली आहे. मेट्रोचे जाळे शहरात सुरू झाल्याखेरीज वाहतूकीचा ताण कमी होणार नाही.हा भूयारी मार्ग ५ किलोमीटरचा असून थेट स्वारगेट येथे निघतो.  पुणे शहराच्या मध्यभागातून म्हणजे कसबा पेठ, बुधवार पेठ, मंंडई अशा ठिकाणांहून तो जमिनीखालून किमान २२ मीटर खोलीतून जाणार आहे. त्यात ५ भूयारी स्थानके असून प्रत्येक स्थानकातून जूानीवर येण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट अशी व्यवस्था असणार असल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या वतीने देण्यात आली. बापट यांनीही त्याचा उल्लेख करत मेट्रोचे काम सुरू असताना होत असलेल्या त्रासाबाबत पुणेकर सहनशीलता दाखवत असल्याबद्धल त्यांना धन्यवाद दिले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोgirish bapatगिरीष बापट