शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांतील गणवेश बदलणे अशक्य

By admin | Updated: May 18, 2015 05:31 IST

जिल्हा परिषद शाळेतील मुलांना यंदाही पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट तर मुलींना निळा स्कर्ट व पांढरा शर्ट हाच गणवेश घालावा लागणार आहे.

पुणे : जिल्हा परिषद शाळेतील मुलांना यंदाही पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट तर मुलींना निळा स्कर्ट व पांढरा शर्ट हाच गणवेश घालावा लागणार आहे. मात्र अनुदानप्राप्त ९८ हजार विद्यार्थ्यांना टाय, बूट व सॉक्स देण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे तोच तो गणवेश घालून कंटाळलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात रंगीबेरंगी गणवेश देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा होता. तसा प्रस्ताव करून स्थायी समितीच्या बैठकीत त्याला मान्यताही घेतली होती. आकर्षक रंगसंगतीचे गणवेश दिले तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून शाळेची आवड निर्माण होईल, याचा विचार करून गणवेश बदलण्याचा निर्णय झाला होता. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण विभागाचे सभापती शुक्राचार्य वांजळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेख यांनी शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. तसे शिक्षण विभागाने शासनाला पत्र पाठवून कळविले होते. मात्र, गणवेश, त्याचा रंग बदलण्याचा सर्वाधिकार शाळा व्यवस्थापन समितीस आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत हा निर्णय करून शासनाकडे तसा ठराव पाठवून त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर उरलेल्या कालावधीत ही सर्व प्रोसेस करून कापड उपलब्ध करून ९८ हजार विद्यार्थ्यांना गणवेश पुरवणे हे जिकिरीचे काम आहे. त्यामुळे यंदा तरी ते अशक्य दिसत आहे. (प्रतिनिधी)