शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
14
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
15
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
16
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
17
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
18
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
19
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
20
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग; खंडेरायाचा भंडारा भेसळयुक्त, भाविकांच्या श्रद्धेशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:37 IST

गेल्या काही वर्षांपासून "यलो पावडर "नॉट ईडीबल" ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा जत्रा यात्रा उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर विकला जातोय

जेजुरी: कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक जत्रा यात्रा उत्सवामध्ये भंडारा -आणि खोबरे याला अनन्य साधारण महत्व आहे .राज्यातून येणारा भाविकभक्त येथे दाखल  होत  मोठ्या श्रद्धेने भंडारा खरेदी करतो देवाच्या चरणी अर्पण करतो. तळीभंडारा ,जागरण गोंधळ- कोटांबा पूजन -लंगर तोडणे आदी धार्मिक विधी करत हा भंडारा कपाळी लावतो. प्रसाद म्हणून भाविक भक्षणही करतो. काही भाविक जेजुरीतून खरेदी केलेला भंडारा वर्षभर देवघरात ठेवून पावित्र्य जपतो. या सोनपिवळ्या भंडाऱ्यामुळेच "सोन्याची जेजुरी "हे नाव प्रचलित झाले आहे .मंगल कार्यात हळद ही भाग्याची तर कुंकू सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.  मात्र ,गेल्या काही वर्षांपासून या भंडाऱ्याला भेसळीचे ग्रहण लागले असून "यलो पावडर " नॉट ईडीबल" ट्रमरीक पावडर या नावाने येथे भेसळयुक्त भंडारा जत्रा यात्रा उत्सव काळात  मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या भंडाऱ्यामुळे त्वचेची आग होणे ,डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे या समस्या जाणवतात. सर्वात गंभीर बाब म्हणजे भेसळयुक्त भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जेजुरी गडाच्या ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असल्याचा अहवाल मागील काळात पुरातत्व खात्याने दिला असून त्यावर निर्बंध घालण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

गेली अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. याबाबत देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त शिवराज झगडे, पत्रकार प्रकाश फाळके यांनी शुक्रवारी (दि.२८) मुंबई येथे अन्न व औषध भेसळ प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेत यावर शासनाकडून निर्णय घेत ठोस उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. . हळद आणि कुंकू यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून याबाबतच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत भेसळयुक्त भंडारा हा भाविकांच्या श्रद्धेशी खेळ आहे .लवकरच यावर ठोस निर्णय घेत उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील असे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी दिले .

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीTempleमंदिरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्यKhandoba Yatraखंडोबा यात्रा