शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस व सामाजिक यंत्रणा यांच्याकडून समन्वयाकरिता एकत्रितपणे प्रयत्न होणे अत्यावश्यक : आ. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 10:24 PM

पुणे : देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत पुणे, मुंबई सारख्या शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, प्रसार माध्यमांचे असलेले लक्ष यामुळे 2016 या वर्षांत गुन्ह्यांच्या प्रमाणातही अल्पशी घट झाली असली तरी दुर्लक्षणीय नाही.

पुणे : देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत पुणे, मुंबई सारख्या शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले शहरीकरण, प्रसार माध्यमांचे असलेले लक्ष यामुळे 2016 या वर्षांत गुन्ह्यांच्या प्रमाणातही अल्पशी घट झाली असली तरी दुर्लक्षणीय नाही. आयटी क्षेत्र व सायबर तसेच बालक महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये ही नागपूर, पुणे, मुंबई यांत गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याची  खंत त्यांनी व्यक्त केली आहे.गेल्या २०१५ पर्यंत गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे कमी असलेले प्रमाण व जमिनींच्या वाढत्या भावातून आलेला पैसा व त्यातून गुंडगिरी याचेच हे कटू फळ आहे, असे म्हणावे लागेल. पुण्यासारख्या  शहरांतील सत्ताधारी पक्षांच्या राजकीय नेतृत्वाने गुंडांसाठी लाल गालीचा अंथरल्याने त्याचा हा परिपाक आहे. काही प्रामाणिक वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगले काम करूनही कमी मनुष्यबळाने त्यांच्या कार्यपद्धतीला मर्यादा येत असल्याने या शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस व सामाजिक यंत्रणा यांच्याकडून समन्वयासाठी एकत्रितपणे प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे मत शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज व्यक्त केले आहे.राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात महाराष्ट्र गुन्ह्यांच्या एकंदर नोंदीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावर आपले अभ्यासपूर्ण विवेचन आ. डॉ. गोऱ्हे यांनी आज दिले आहे. त्या म्हणाल्या, एकट्या दिल्ली शहरात १३,७७७ महिलाविषयक गुन्हे घडले असल्याने ही बाब चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशातल्या प्रमुख २० महानगरांच्या तुलनेत ३९ टक्के गुन्हे एकट्या दिल्लीमध्ये आहेत. त्याचवेळी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात पुणे व मुंबईच्या तुलनेत अधिक प्रमाणात व देशात आठव्या क्रमांकावर गुन्हेगारी घडत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या म्हणतात, राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात पण महिलाविषयक गुन्ह्यांची हाताळणी संवेदनशील पद्धतीने न होणे, हे गुन्हे हाताळताना संवेदनशीलता पाळली जाते किंवा नाही हे देखरेख करणारी व तपासण्याची सक्षम यंत्रणाही उपलब्ध नाही ही आजही भेडसावणारी मोठी समस्या आहे. यावर प्रभावीपणे काम होणे अत्यंत आवश्यक आहे.मुंबईच्या तुलनेत पुणे, नागपूर ही शहरे गुन्ह्यांमध्ये पुढे आहेत. याची कारणमीमांसा देताना त्या म्हणाल्या, या दोन्ही शहरांच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झालेली जमिनीच्या भावातील वाढ, त्यातून आलेली चंगळवादी प्रवृत्ती, गुंडगिरी, बेकायदा शस्त्रे वापरण्याच्या प्रमाणात अचानक झालेली वाढ प्रामुख्याने कारणीभूत आहे. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाCrimeगुन्हा