शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐन उन्हाळ्यात पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:47 IST

सांगवी ग्रामस्थांनी बोलावली विशेष ग्रामसभा : प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सांगवी : नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाला वारंवार लेखी व तोंडी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असून, त्याची कोणीही दखल घेण्यासाठी पुढे सरसावत नाही. यामुळे आता नागरिकांमधून संतापाची लाट उसळत चालली आहे. नदीकाठच्या बारामती व फलटण तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी (दि. २०) सांगवी (ता. बारामती) येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या ग्रामसभेनंतर नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत पाण्याचा प्रश्न पेटणार आहे.

नीरा नदीच्या पाण्यात रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदूषणमुक्त नदी होण्याचा मार्ग मोकळा होत नाही. दूषित पाण्यामुळे आरोग्यासह शेतीच्या पिकांना मोठा धोका उद्भवू लागला आहे. या पाण्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन पाण्यावर खच साचत आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. यामुळे ग्रामस्थांची डोकेदुखीही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. शिरवली येथील नीरा नदीवर असणाऱ्या बंधाºयांत पाणी अडविण्यात आले आहे. या पाण्यात ओढ्यामार्फत फलटण तालुक्यातील खासगी व सहकारी प्रकल्पांतील रसायनमिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असते. या रसायनमिश्रित सांडपाण्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. पाणी काळेकुट्ट झाले आसून, त्याला उग्र वास येत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, हे पाणी शेतातील पिकांना दिल्यानंतर पिकांची वाढ खुंटली जाऊन पिके जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकºयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासकीय कार्यालयांत लेखी व तोंडी सूचना देऊन या गंभीर प्रकाराबद्दल दखल घेतली जात नाही. तक्रार केल्यानंतर प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. त्यामुळे सांगवी परिसरातील कांबळेश्वर, शिरवली व फलटण तालुक्यातील सांगवी, सोमंथळी, सोनगाव व माळवाडी येथील ग्रामस्थांनी सांगवी (ता. बारामती) येथे विषेश ग्रामसभा घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास नियोजन व पुढील दिशा ठरणार आहे.४मात्र, सध्या झालेल्या प्रदूषणामुळे ग्रामसभेनंतर संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी सांगवी व परिसरातील गावांसह वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांनी व शेतकºयांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन सांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.४यामुळे या विशेष ग्रामसभेनंतर महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ आता जागे होऊन ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येणार की गेंड्याची कातडी चढवून बसणार, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.पिण्याच्यापाण्यासाठी ‘लोकसभा’ मतदानावर बहिष्कारबारामती : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील महिला आक्रमक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनीग्रामपंचायतीचा ठराव संमत केला आहे.बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील महिला आक्रमकलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती रोल मॉडेल म्हणून नावाजलेले असताना जिरायती भागात लोकांना प्यायला पाणी नाही. या पार्श्वभूमीवर, आक्रमक झालेल्या महिलांमुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत. येथील महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. सोमवारी (दि. १८) देऊळगाव रसाळ (ता. बारामती) येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी, जोपर्यंत गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही, तोपर्यंत आगामी काळातील निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.४येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच कौशल्या बन्सीलाल सपकळ होत्या. येथे पिण्याच्या पाण्याची काही दिवसांपासून भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावाला शासनाकडून टँकर सुरू आहेत; मात्र ते पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे.याबाबत आज ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय लोंढे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अंकुश रसाळ, दूध संघाचे माजी संचालक सुरेश रसाळ तसेच ग्रामसेविका सोनाली जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी ग्रामसभेत महिला मोकळे हंडे घेऊन आल्या होत्या. पाण्यासाठी महिलांनी ग्रामसभेतच मोकळे हंडे वाजून गोंधळ घातला.या ग्रामसभेत ग्रामस्थांनी, जोपर्यंत गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही, तोपर्यंत आगामी काळातील निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार टाकण्यात यावा, असा ठराव बहुमताने मंजूर करून घेतला. या वेळी गावातील आजी-माजी पदाधिकाºयांनी बहिष्काराच्या मुद्द्याला विरोध केला. मात्र, बहिष्कार घालण्यात यावा, या बाजूंनी जास्त ग्रामस्थांचा कल असल्याने पदाधिकाºयांनाही ग्रामस्थांसमोर गप्प बसावे लागले.

टॅग्स :Puneपुणे